google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मुंबईच्या आंदोलनासाठी नाशिकवरून मराठा समाज बांधव हजारोंच्य्या संख्येने सहभागी होणार…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- पंचवटी मराठा आरक्षणासाठी मुंबईला आंदोलनासाठी जाणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यासमवेत नाशिकवरून मराठा समाज बांधव हजारोंच्य्या संख्येने सहभागी होणार असून, या मार्चात सहभागी होणाऱ्या समाज बांधवाना चार दिवसांसाठी रसद पुरविणार असल्याचा निर्णय मराठा आरक्षण मुंबई आंदोलनाच्या संदर्भात पंचवटीतील औदुंबर लॉन्स येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

बैठकीप्रसंगी सुनील बागूल, चंद्रकांत बनकर, नाना बच्छाव, शिवाजी सहाने, योगेश नाटकर, गौरव गोवर्धने, डॉ. सचिन देवरे, करण गायकर, एकता खैरे, ममता शिंदे, रोहिणी उखाडे,मामा राजवाडे, सुनील निरगुडे, हार्दिक निगळ, विशाल कदम, मंगेश धनवटे, स्वाती कदम, नीलेश मोरे, शरद लभडे, संदीप लभडे, सचिन पवार आदी उपस्थित होते. बैठकीस उपस्थितांनी नाशिककर बांधव अन्नधान्याच्या माध्यमातून मदत करतील. त्यासाठी अन्नधान, तेल आदी जमा करायचे आहे. या मार्चात समाजबांधवांना समाविष्ट करून घेण्यात येईल. दुचाकी रॅलीत तरुण-तरुणी सहभागी होतील. घराघरातून समाज बांधव सहभागी होतील. मराठवाडा ताकदीने उभा आहे.

उत्तर महाराष्ट्रातूनही अशीच ताकद उभी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.सुनील बागूल यांनी युवक-युवतींनी दुचाकीवर सहभागी व्हावे, नाशिकचा ताफा मोठा दिसालया हवा, राजकीय लोकांनीही निर्भयपणे मोर्चात सहभाग घ्यावा, असे सांगितले. शिवाजी सहाणे यांनी नाशिकचे मराठा समाज बांधव पिंपरी चिंचवड मार्गे जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत जुडणार आहेत. मोर्चात नियमांचे पालन करीत शांतता व शिस्त पाळावी, असे सांगितले. डॉ. सचिन देवरे यांनी मोर्चात तालुका मराठा मेडिको सहभागी होतील तसेच, मोर्चासाठी पाच अँम्बुलन्स देणार असल्याचे सांगितले. मराठा आरक्षण मुंबई मोर्चा जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. योगेश कापसे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील निरगुडे यांनी आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *