google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळाची शिवजयंती उत्सव २०२४ च्या मूर्तिकामाचा शुभारंभ दिमाखात साजरा…

author
0 minutes, 2 seconds Read


नाशिक :- या वर्षीही A.S.M.M. Group पुन्हा एकदा भा.ज.पा. कामगार आघाडीचे प्रणेते तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी व्यंकटेश नानासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शना नुसार पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहेत. तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांनी ठरवल्या प्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्य दरवर्षी प्रमाणे करण्याचे योजिले आहे.
शुभारंभ वेळी 111 श्री फळांचे(नारळ)आहुती चे हवन करून मूर्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, अखिल भारतीय मराठा महासंघांचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काका बनकर, मराठा महासंघांचे कार्यध्यक्ष राजेंद्र काका शेळके, भा.ज.पा. कामगार आघाडीचे युवा नेतृत्व विक्रमजी नागरे, भा.ज.पा. कामगार आघाडीचे शहराध्यक्ष हेमंतजी नेहेते. नाशिकनामाचे संपादक नितीनजी सुगंधी, छावा संघटनेचे संस्थापक करणजी गायकर, श्रमिकसेनेचे जिल्हाप्रमुख अजयजी बागुल, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील, हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे युवानेतृत्व सागरजी देशमुख, भा.ज.पा. युवामोर्चाचे शहाराध्यक्ष सागर शेलार, व भा.ज.पा. युवामोर्चाचे उपाध्यक्ष सचिन मोरे व प्रशांत वाघ, शिवसेना उपमहानगर प्रमुख आनंद मामा फारताळे , ईशा पब्लिसिटी चे प्रमुख पप्पू भाऊ मराठे, नाशिक B.V.G. चे प्रमुख बाळासाहेब कंक्राळे, साईबा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कदम, जुने नाशिक शिवाजन्मोत्सव समितीचे अक्षय कलंत्री, विकी ढोले, कुणाल खोंड तसेच रणजितजी पाटील, नाना बच्छाव, सोमनाथ भाऊ जाधव, सचिनजी पवार, विनोद येवले, सचिन कमाणकर, अमितजी खांदवे, शुभम फुले, सार्थक नागरे, तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते.


यावेळी अशोकस्तंभ शिवाजन्मोत्सव 2024 साठी अध्यक्ष समीर व्यवहारे, उपाध्यक्ष वैभव वीर व हर्षद निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी नाशिकचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिगंबरजी मोगरे आणि सह्याद्री सारखे मंडळाच्या पाठीशी उभे राहिलेले व मंडळाला लाभलेले मोलाचे सहकार्य केशवजी डिंगोरे यांच्या हस्ते अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपाध्यक्षांचा सत्कार मूर्तिकार हितेश पाटोळे व भैया पाटोळे आणि मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक पिंटू भाऊ छल्लानी व आनंद मामा फारताळे यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी अशोकस्तंभ साईबाबा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, भा.ज.पा.कामगार आघाडी माथडी सेलचे शहराध्यक्ष, भा.ज.प. कामगार आघाडीचे लोकसभा संयोजक आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवाजिल्हाध्यक्ष व्यंकटेश नानासाहेब मोरे यांनी याही वर्षी नाशिकच्या तमाम शिवप्रेमींना डोळ्यांचे पारणे फेडणारा शिवजन्मोत्सव अनुभवायला मिळणार असे आश्वासन दिले.
शिवरायांच्या चरणी प्रार्थना करुन १८ पगड जातींच्या साक्षीने घेण्यात येणारा महोत्सव हा महाराष्ट्रातील नाविन्य पुर्ण उपक्रम असून व्यंकटेश मोरे यांनी शासकिय सेवा योजना,सुलभ रित्या नागरिकांपर्यंत पोहचवण्याची शपथ या निमित्ताने घेतली. युवा युवतींना मिळणारे वेतन हे शासकिय नियमा प्रमाणे मिळालेच पाहिजे. कामगारांचे हक्क त्यांना मिळावे, असे आव्हान नाशिक जिल्हयातील सर्व आस्थापनांना संबोधित करत शिवरायांसमोर वचन घेतले.
या अभूतपूर्व क्षणांचे आपणही साक्षीदार व्हावें मंडळ आपल्या हक्काचे स्थान आहे असे सांगत महाराष्ट्रातील जनतेला कार्यकमाचे आमंत्रण दिले आहे. जय जिजाऊ जय शिवराय

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *