google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

२ जानेवारीला पुन्हा राजकीय नेते,संस्था,संघटनांनी एकत्रित नाशकात बैठक…

author
0 minutes, 2 seconds Read

मराठे एकत्रित शिवतीर्थावरुन मुंबईस निघतील,

तत्पूर्वी तालुकावार मराठा समाजाची जागृतीचे आजच्या बैठकीत नियोजन,

नाशिक :- मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली पासून असंख्य मराठ्यांना घेवून थेट मुंबईस निघतील,दरम्यान नाशिकहून मराठा समाजाचे आपण सर्व जण ठरेल त्या दिवशी नाशिकच्या शिवतीर्थावर जमू तेथून मुंबईस गाड्यांसह ,सर्व लवाजमा घेवून मुंबईस मराठा आंदोलनासाठी प्रस्थान करू,असा निर्णय घेवून सकल मराठा समाजाच्या आजच्या (दी 30 रोजीच्या) बैठकीत येत्या २ जानेवारीला पुन्हा नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात राजकीय लोकप्रतिनिधी,संघटना,संस्था,उद्योजक,डॉकटर इंजिनियर,शिक्षक व सर्वांची एकत्रित बैठक होईल,तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात मराठा समाजाच्या तालुका वार बैठका v सभा घेण्याबाबत नियोजन या बैठकीत जाहीर करण्यात आले,यावेळी विविध मराठा समाजाचे पदाधिकारी यांनी मराठा आंदोलनात स्वतः काय योगदान देणार?याबद्दल मांडणी केली,तसेच मराठा विरोधी प्रवृत्तीच्या निषेधाचे ठराव ही या बैठकीत करण्यात आले,

नाशिकच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आज दिं ३० रोजी मुंबईतील जाहीर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा v सहभागासाठी सर्व राजकीय सामाजिक मंडळींची बैठक यावेळी झाली,या बैठकीत उपस्थित मंडळींनी मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या नियोजनात योगदान विषयावर मांडणी केली,
यावेळी माजी आमदार अनिल आहेर,यांनी नांदगाव मालेगाव भागातील आम्ही मराठा आंदोलनात सक्रिय राहू मिळेल ते सहाय्य करू असे सांगितले,तर दत्ता गायकवाड यांनी सर्व शक्ती निशी आपण आंदोलनात सहभागी होऊ,पाणी जेवण प्रवास अश्या सेवा देवू असे सांगितले, शिवाजी शहाणे यांनी यावेळी दोन ठराव मांडले त्यात मराठा विरोधी छगन भुजबळ यांच्या निषेधाचा ठराव केला,दुसरा ठराव समाजाच्या मतांवर आमदार खासदार यांनी मुंबईतील मनोज जरागे पाटील यांच्या आंदोलनात पाच दिवस बसा, योगदान द्या असे ठराव करून आपण नाशिकहून २५ जनेवरीसला निघू,समाजाचा जमा निधी आंदोलनास द्यावा असे मुद्दे मांडले,यावेळी करण गायकर यांनी जे सर्व नेते आमदार खासदार,नगरसेवक या बैठकीत का आले नाही?असा सवाल केला,आम्ही तुम्हाला जाब करू असा इशारा दिला,मराठा समाजाला आडवे येणाऱ्यांना आम्ही गनिमीकावा दाखवू असे सांगितले,तर माझी आमदार संजय चव्हाण यांनी “मनोज जरांगे पाटील व मराठ्यांची औकात काढणाऱ्या स त्याची औकात दाखवू v त्यास गावात येवू देणार नाही असा सवाल केला,यावेळी नगरसेविका वत्सला खैरे,शाहू खैरे,विलास शिंदे यांनी ही मराठा आंदोलनात सहभाग व सेवा देवू असे सांगितले,तर प्रफुल्ल वाघ यांनी जुने नाशिक ताकत सह मराठा आंदोलनात सहभागी होईल असे सांगितले,
यावेळी चंद्रकांत बनकर ,शिवाजी सहाणे यांनी तालुका वार नियोजन जाहीर केले,त्यात नियोजित तारखेत सकाळी ११ वाजता v दुपारी ३ वाजता अनुक्रमे बैठका होतील,
५ जानेवारीला इगतपुरी त्र्यंबक मध्ये मराठा बैठक सभा,६ जानेवारी ला सिन्नर निफाड ,७ जानेवारीला दिंडोरी सुरगाणा पेठ,८ जानेवारीला येवला नांदगाव,९ जानेवारीला चांदवड मालेगाव,१० जानेवारी कळवण सटाणा देवळा मराठा सभा बैठका होतील,तर २ तारखेला नाशिकच्या माविप्रच्य रावसाहेब थोरात सभागृहात सर्व पक्षीय आमदार खासदार नगरसेवक संस्था संघटना,उद्योजक व्यावसायिक,डॉकटर इंजिनियर,शिक्षक यांची संयुक्त बैठक होईल,त्याचा वेळ दुपारी ४ वाजता राहील,
प्रास्ताविक सूत्रसंचालन नितीन डांगे पाटील यांनी मानले,आभार राम खुर्दळ यांनी मानले,
यावेळी नाना बच्छाव,दत्ता गायकवाड,विजय करंजकर,बंटी भागवत,चंद्रकांत बनकर,माजी आमदार अनिल आहेर,संजय चव्हाण,नगरसेवक विलास शिंदे,वत्सलाताई खैरे,शाहू खैरे,शिवाजी शहाणे,करण गायकर l, नितीन रोटे पाटील,संदीप मेढे,योगेश नाटकर,विकी गायधनी,प्रफुल वाघ,यासह डॉ रुपेश नाठे,करण गायकर निलेश ठूबे,हिरामण नाना वाघ,कैलास खांड बहाले,माजी सैनिक बाळासाहेब गाडे,पंढरीनाथ कापसे,
प्रकाश धोंगडे,दिनेश सावंत,गणेश पाटील,एकता खैरे, मंगला शिंदे,ad स्वप्ना राऊत,ममता शिंदे,सोमनाथ बोराडे,अमित नडगे, महेंद्र बेहेरे,भारत पिंगळे,शेळके दादा,यासहपूजा धुमाळ , मंगला शिंदे , रोहिणी दळवे , वंदना भोसले , प्रमिला जाधव , स्वप्ना राऊत , प्रमिला पाटिल , ज्योती जाधव , रोहिनी उखाडे , शिल्पा चव्हाण , ममता शिंदे ,सविता जगताप , स्वाती कदम,सागर वाबळे,गौरव गाजरे, कवडे यासह विविध संघटना संस्था,पदाधिकारी उपस्थित होते,शेवटी मराठा मित्र ज्ञानेश्वर सुरासे यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले,

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *