google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक येथे १ जानेवारी रोजी होणारा छावा क्रांतिवीर सेनेचा १० वा वर्धापन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा – करण गायक

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक वृत्त:- छावा क्रांतिवीर सेनेच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक सौभाग्य लॉन्स पपया नर्सरी या ठिकाणी संपन्न झाली.या बैठकीमध्ये येत्या १ जानेवारी २०२४ रोजी संघटनेचा १० वा वर्धापन दिन तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा याबाबत नियोजन आढावा बैठक घेण्यात आली.

यामध्ये सदर कार्यक्रमा संदर्भात विविध समिती गठीत करत प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सुपूर्द करण्यात आली.संघटनेच्या १० व्या वर्धापन दिनी विशेष निमंत्रित पाहुण्यां पासून ते संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,हितचिंतक,मित्र परिवार यांच्या सर्व सोयी सुविधा याबाबत नियोजन करण्या बाबत विचार विनिमय करण्यात आले.सदर कार्यक्रम १ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता सौभाग्य लॉन्स,पपया नर्सरी,सातपूर,नाशिक येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

त्यामध्ये उद्घाटक म्हणून राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या धर्मपत्नी आयुषी ताई देशमुख कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्रीमंत छत्रपती मधोजीराजे भोसले छत्रपतींचे वंशज नागपूर संस्थान हे असणार असून कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती नामदार बच्चू कडू कामगार नेते अभिजीत राणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन आजच्या या बैठकीत करण्यात आले. या वर्धापन दिनामध्ये शेतकरी कामगार सहकार शिक्षण आरोग्य महिला या क्षेत्रामधील प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.तसेच या कार्यक्रमा बाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन व नियोजन कमिटी गठीत करण्यात आलेली आहे.

ती पुढील प्रमाणे प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे,युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग,केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहुळे,युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण डोखे,प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर,महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोरमा ताई पाटील,उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष संगीता ताई सूर्यवंशी,आयटी विभाग प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी,आयटी प्रदेशाध्यक्ष किरण बोरसे,उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस विकास काळे,विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख गिरीश आहेर,उत्तर महाराष्ट्र संघटक योगेश सोनवणे,एडवोकेट नवनाथ कांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष पदाची जबाबदारी नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळस्वागत कार्याध्यक्ष महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांची निवड एक मताने करण्यात आली.कार्यक्रमासाठी ज्या कमिट्या स्थापन करायचे आहे ते सर्व अधिकार वरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे येत्या दोन दिवसात सर्व नियोजन कमिट्यांची निवड वरील नियोजन कमिटीच्या मार्गदर्शनात करण्यात येईल अशी माहिती जिल्हाप्रमुख आशिष हिरे यांनी दिली.या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *