google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

रंजल्या गांजलेल्याची,मुक्या जीवाची सेवा हा भक्तिमार्गच…

author
0 minutes, 0 seconds Read

नाना बच्छाव यास आद्यकवी महदंबा स्मृती पुरस्कार वितरण,

गिरणारे ता नाशिक येथील दत्तजयंती उत्सवात पूज्य सुकेनेकरबाबा शास्त्रीचे निरूपण.

नाशिक :- रंजल्या गांजलेल्यांची सेवा,मुक्या जीवाला आपलेसे करा हीच तर परमेश्वराची भक्ती आहे.निरपेक्ष सेवा हाच भक्तीचा मूळ पाया आहे असे निरूपण श्रीदत्त जन्मोत्सवानिमित गिरनारे तां नाशिक येथील एकमुखी दत्त मंदिर परिसरात आयोजित कवी महदंबा स्मृतिदिनी केले.यावेळी शेतकरी आंदोलने,मराठा उपोषणात झोकून कार्य करणाऱ्या नाना बच्छाव यास कवी महादंबा स्मृती पुरस्कार आचार्य सुकेनेकर शास्त्री यांचे हातून देण्यात आला.गिरनारे ता नाशिक येथील एकमुखी दत्त मंदिरात भक्त परिवार व ट्रस्ट वतीने तसेच महंत चक्रपाणी बाबा,पू.विशाल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी दिनांक २६ डिसेंबरला दत्त जयंती महोत्सव झाला

यावेळी पहाटे देवपूजा अभिषेक,त्यानंतर उटी अवसर सकाळी ९.०० धर्म ध्वजाचे अनावरण नाना बच्छाv यांचे हातून झाले,त्यानंतर साधू महंत यांची धर्म सभा झाली,यावेळी महंत चक्रपाणी बाबा यांनी महंत यांचा यथोचित सन्मान केला.यावेळी महंतांनी मार्गदर्शन केले,आचार्य सूकेणेकर शास्त्री यांनी “चक्रधर स्वामींच्या महानुभाव संप्रदायातील कार्य प्रणाली विषद केली,मराठी भाषेच्या आद्यकवी महादंबा स्मृती दिन साजरा होणे हा त्यांच्या काव्याचा गौरव आहे,आणि तो सन्मानाने होणे हे गिरणारेच्या दत्तमंदिरचे कार्य प्रेरणादायक आहे असे ते म्हणाले,यावेळी दत्त भक्तांचे सत्कार करण्यात आले,यावेळी पूज्य सुकेणेकर शास्त्री सोबत प. पु.प. म. दादेराज बाबा बिडकर,दत्तराज बाबा पालिमकरगोविंदराज बाबा अंकुळनेरकर,गोपिराज बाबा सुकेणेकरभीमराज बाबा सूकेनेकरआकाशमुनी बाबा मेहकरकरसुनील राज बाबा मेहकरकरश्रीधर बाबा सूकेणेकर महेंद्रमुनी बाबा शास्त्री,यासह भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता,यावेळी प्रास्ताविक महंत चक्रपाणी बाबा यांनी तर आभार विशाल महाराज यांनी मांडले….

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *