google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे यंदाचे कार्यसन्मान पुरस्कार जाहीर

मान्यवरांच्या हस्ते ३ मार्च रोजी होणार वितरण नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही कार्य सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सोहळ्याचे यंदाचे हे २७ […]

मराठा समाजाला दिले कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता सारथी,अण्णासाहेब पाटील महामंडळाचे मजबुतीकरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई,दि.२७ : मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत बसणारे आरक्षण दिले आहे.ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, ते आरक्षण एकमतानं दिलं आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण दिलं आहे. आज आरक्षण टिकणार नाही असे सांगून […]

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक २७: राज्यातील विकास कामांसाठी पुढील चार महिन्यात लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून केली जाणार असली तरी पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल हे दर्शविणारा हा अर्थसंकल्प आहे. यात दुर्बल घटक, शेतकरी, महिला, युवा अशा सर्वांचा विचार करण्यात आला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री […]

सुयोग हॉस्पिटल, दिंडोरी रोड येथील डॉ. कैलास राठी यांचेवर हल्ला करणार आरोपी २४ तासाचे आत पंचवटी पोलीसांनी घेतले ताब्यात

नाशिक :- दिनांक २३/०२/२०२४ रोजी रात्री ०९:२० वाजेच्या सुमारास सुयोग हॉस्पिटल, नाशिक येथील मिटींग रूम मध्ये डॉ. कैलास जगदीश राठी, वय ४८ वर्षे यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने इसम नामे राजेंद्र चंद्रकांत मोरे याने आर्थिक देवाण-घेवाणच्या वादातुन कोयत्याने डोक्यावर, गळ्यावर वार करून गंभीर जखमी करून पळुन गेला होता. सदर संशयिता विरूध्द डॉ. रिना कैलास राठी […]

पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर हॉस्पिटलच्याच माजी पीआरओच्या पतीने आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला

नाशिक:- पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर हॉस्पिटलच्याच माजी पीआरओच्या पतीने आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. राजेंद्र चंद्रकांत मोरे असे हल्लेखोराचे नाव असून, त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, की डॉ. राठी यांच्याकडे रोहिणी राजेंद्र मोरे या पीआरओ म्हणून काम करीत होत्या. सन 2022 […]

निरोप समारंभ भावनेशी जोडलेला असतो-डॉ.सिताराम कोल्हे

नाशिक प्रतिनिधी :- नाशिक-ज्या शाळेत आपण ज्ञानार्जनाचे काम करतो त्या शाळेच्या शेवटच्या शैक्षणिक वर्षाला निरोप देताना भावनिक होनं साहजिकच आहे.शेवटी गुरु शिक्षक आई-वडील फक्त माहुताचे काम करत असतात परंतु जीवनाची संपुर्ण लढाई स्वतःलाच लढायची असते.कष्टाला पर्याय नाही, संघर्ष हेच जीवन आहे असे मत नाशिक शहराचे पोलिस उपायुक्त डाॕ.सिताराम कोल्हे यांनी व्यक्त केले.कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय […]

नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी भविष्य निधी ऑफिसमध्ये चक्क आयुक्तांनीच केले नियमांचे उल्लंघन

शिपायांजवळ मोबाईल जमा करा नंतर मला भेटा नाशिक जिल्हा पीएफ ऑफिसमध्ये , आयुक्तांचा गजब कारभार नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी भविष्य निधी ऑफिसमध्ये चक्क आयुक्तांनीच केले नियमांचे उल्लंघनपत्रकारांना भेटण्यास नकार , बाहेर मोबाईल जमा करा नंतर मला भेटा, काय काम आहे ते शिपाईला सांगा तरच आत प्रवेशदिनांक २१/०२/२०२४ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आपला महाराष्ट्र न्यूज […]

गंगापुर गांव जकात नाका याठिकाणी रस्त्याने येणारे जाणारे वाहनांच्या काचा फोडुन दहशत निर्माण करणारे आरोपी गजाआड गंगापुर पोलीस स्टेशन यांची विशेष कामगिरी

नाशिक वृत्त:- गंगापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दार जय चंद्रकांत गजभिये याने दिनांक १३/०२/२०२४ रोजी रात्री १०.३५ वाजेचे सुमारास हुन्दाई कार क्रमांक एमएच-१५-एचक्यु-०७१० गाडीतून त्याचे मित्र कुशल अरुण भगत व ओमकार वाळुंज  गाडीतून गिरणारे रोडने नाशिककडे येत असतांना गंगापुर गांव जकात नाक्याजवळ त्यांच्या गाडीच्या समोर अनोळखी इसमांनी आडवे होवुन गाडी अडवुन त्यांचेशी हुज्जत घालुन गाडीची […]

उंटवाडी येथील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी निरोप देताना डॉक्टर सिताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी केले मार्गदर्शन

नाशिक वृत्त:- नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित उंटवाडी माध्यमिक विद्यालय नाशिक येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती नासिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर सिताराम कोल्हे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ना ए सोसायटीचे उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष माननीय चंद्रशेखर मोंढे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र […]

आमदार राहुल ढिकले यांच्या घरावर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा लोकप्रतिनिधींनी येणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या संदर्भात आवाज उठवा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ

नाशिक:- सकल मराठा समाज आरक्षणासंदर्भात येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनात भूमिका मांडावी यासाठी आज नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांना सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानासमोर आक्रोश आंदोलन करत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठा आरक्षणासंदर्भात येत्या २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलविले […]