google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

आज पासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण

सगेसोयरे व गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी सरकारने १३ जुलैपर्यंतची वेळ मागून घेतली होती. परंतु सरकारने याही वेळी मराठ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. प्रकृती साथ देत नसल्यामुळे उपोषणा ऐवजी दुसरा मार्ग निवडावा असे बहुतांश मराठा बांधवांना वाटते. परंतु सरकार सूडबुद्धीने मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करीत आहे. त्यामुळे लोकशाही […]

मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे राज्य शासनाचे व केंद्र शासनाची कर्तव्य आहे – ॲड. सुरेश काळे

परतूरमध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन प्रतिनिधी परतूर दि. 19/07/2024 रोजी परतूर तालुका विधी सेवा समिती व वकील संघ परतुर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा परतुर येथे कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या शिबिरात परतूर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एल.डी. कोरडे, सह न्यायाधीश अर.बी. सूर्यवंशी, वकील संघाचे अध्यक्ष महेंद्र वेडेकर, सचिव सुरेश काळे, टी.व्ही. […]

शिवरायांची वाघनखं पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात दाखल, १९ जुलैपासून प्रदर्शन

शिवप्रेमी ज्या क्षणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहात होते ती शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं लंडनहून अखेर महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत.लंडनहून ही वाघनखं मुंबईतआणली गेली त्यानंतर ती स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या साताऱ्याकडे रवाना करण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही वाघनखं साताऱ्यात आणली गेली. पुढील दहा […]

भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना दाखले देण्यासाठी मोहीम राबवावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विधानभवन येथे भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात बैठक झाली. याप्रसंगी गृहनिर्माण तथा इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, माहिती व तंत्रज्ञान, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय पुरी भटके विमुक्त विकास परिषदेचे पदाधिकारी हजर होते. सर्व विभागीय आयुक्त, सर्व […]

मुख्यमंत्री म्हणतात.. आंदोलन करू नका, मी प्रश्न सोडवतो…

मुंबई (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना घेवून राज्यभरात व्हॉईस ऑफ मीडियाने लाक्षणिक उपोषण करून राज्य सरकारला पत्रकारांसाठी जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये ३४२ ठिकाणी पत्रकार रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनामध्ये हजारो पत्रकार रस्त्यावर उतरले होते. या मागण्यांसंदर्भात व्हॉईस […]

सुर्डी राजेगाव रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिक उतरणार रस्त्यावर…

सुर्डी राजेगाव रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुर्डी राजेगाव सह या मार्गावरील सर्व नागरिक 12 जुलै रोजी उतरणार रस्त्यावरशेगाव,उमापूर,तलवडा,सुर्डी राजेगाव या रस्त्याचे काम 2019 पासून सुरू आहे हे काम सुर्डी पर्यंत येऊन थांबलेले होते. परंतु या मार्गावरील गावकऱ्यांनी आंदोलन मोर्चे करून सदरील काम सुरू करण्यास भाग पाडले परंतु काम सुर्डी कडून पहिला टप्पा करणे गरजेचे होते तसे […]

खासदार निलेश लंकेंचं बैलगाडीतून कांदा, दूध दरासाठी आंदोलन…

अहमदनगर : कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. गाई आणि म्हशी घेऊन अहमदनगर मनपापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी निलेश लंके यांनी बैलगाडीतून आंदोलन करत गळ्यात कांद्याच्या माळा परिधान केल्या होत्या. यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदन […]

चितेगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता नववी उर्दू वर्गाला मान्यता.

अमर अक्रम सय्यद यांच्या प्रयत्नांना यश छत्रपती संभाजीनगरवृत्त :- पैठण तालुक्यातील चितेगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता उर्दू पहिली ते आठवी पर्यंत होती. परंतु चितेगावातील केंद्रीय प्राथमिक शाळेत उर्दू मुलींची संख्या जास्त असून सुद्धा नववी , दहावी वर्ग करीता मान्यता देण्यात येत नव्हती तरी जिल्हा परिषद छा संभाजीनगर येथे मागील चार वर्षापासून मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा करून […]

सुरेश कुटे यांच्या सर्व प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे द्या-आ.राजेश टोपे

जालना :- राज्याचे माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रिडिट सोसायटी लि,बीड यांच्या राज्यात जवळपास 100 च्या वर शाखा असून हजारो कोटीच्या दरम्यान ठेवी आहेत.सोसायटीने आकर्षक व्याजदर दिल्यामुळे गोरगरीब लोकांनी काबाड कष्ट करून रोजंदारी करून पन्नास हजार,एक लाख रुपये अशा खूप मोठ्या पद्धतीनं ठेवी ठेवल्या आहेत. मोठ्या धनिकांच्या […]

कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुळसाधार पावसाची शक्यता :- हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आज काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांत देखील मध्यम पावसासह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज काही भागांत मुसळधार पावसाची […]