google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

बिटको कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी संरक्षण क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन… कर्नल अनिल बेदरकर यांनी दिल्या टिप्स…

नाशिकरोड :- ” आपले आयुष्य यशस्वी होण्यासाठी आज कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतानांच विचार करण्याची योग्य वेळ असून सशस्त्र सेनेत करिअर करायचे असेल तर अभ्यासाबरोबरच खूप कष्ट व मेहनत घेण्याची क्षमता असायला हवी. त्यासाठी सुरुवातीपासूनच आपल्यात योग्यता, वैशिष्ट्ये व आवड असावी. संरक्षण दलातील करिअर म्हणजे जॉब नोकरी नसून सेवापरमोधर्म या तत्त्वाने देशासाठी अविरत सेवा आहे. अनेक […]

विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. चिंतामणी ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या वतीने गणेश कला व क्रीडा मंच येथे आयोजित गुरुजन गौरव समारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी केंद्रीय […]

मोदी-शहांची ‘लाडका मित्र’ योजना, मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव, धारावीवरुन ठाकरे आक्रमक

‘आमचं सरकार आल्यानंतर धारावी टेंडर रद्द करू आणि धारावीकरांच्या हिताचे टेंडर आणू.’ असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ‘मुंबईला लुटायचे, मुंबईला भिकेला लावायचे कारस्थान आम्ही होऊ देणार नाही.’, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. धारावीमधील झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी अदानी उद्योग समूहाला […]

आज पासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण

सगेसोयरे व गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी सरकारने १३ जुलैपर्यंतची वेळ मागून घेतली होती. परंतु सरकारने याही वेळी मराठ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. प्रकृती साथ देत नसल्यामुळे उपोषणा ऐवजी दुसरा मार्ग निवडावा असे बहुतांश मराठा बांधवांना वाटते. परंतु सरकार सूडबुद्धीने मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करीत आहे. त्यामुळे लोकशाही […]

मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा  ‘तुळशी तलाव’ आज सकाळी साडेआठ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी देखील 20 जुलै 2023 रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. 804.6 कोटी लीटर अर्थात 8046 दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष […]

 मोठी बातमी: नीट युजी परीक्षेचा रिझल्ट जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्थेने शनिवारी दुपारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (UG) अर्थात नीट युजीचा निकाल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला आज दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वी पाच मिनिटं आधी एनटीएकडून नीट युजीचा निकाल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नीट परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येण्यासाठी शहरनिहाय आणि केंद्रनिहाय स्तरावर या […]

विधानसभेला होणार सुपरफास्ट व्होटींग!

लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. एकाच मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढल्याने हा गोंधळ झाल्याने आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला असून तशापद्धतीच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाला केल्या आहेत. राजकीय पक्षांनी मुंबईमध्ये लोकसभा मतदानाच्या वेळेस झालेल्या […]

नाशिकरोड येथील सराफी दुकानात चोरी…

नाशिक – सराफी दुकान फोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. ही घटना नाशिकरोड येथील इस्टीम टावर भागात घडली असून दुकानातील सुमारे ८२ हजार रूपये किमतीचे दागिणे लांबविण्यात आले आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीदास गजानन दुसाने (रा.लोखंडे मळा,लक्ष्मण नगर जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. इस्टीम टॉवर या इमारतीतील दुसाने ज्वेलर्स […]

जिल्हा पोलीस दलातील 476 पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या

जिल्हा पोलीस दलातील 476 पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या आज (शनिवार) करण्यात येणार आहे. ज्या पोलीस अंमलदारांना 31 मे, 2024 रोजी एका पोलीस ठाण्यात/ शाखेत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत अशा अंमलदारांकडून तीन पसंतीच्या ठिकाणासह अर्ज मागविण्यात आले होते. अशा बदलीपात्र अंमलदारांना आज येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 11 वाजता बोलविण्यात आले आहे. प्रत्येक अंमलदारांना […]

विशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा

मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील घटनेमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये. या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ नये, याची कोल्हापूर जिल्हा व पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच विशाळगड घटनेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घेऊन समाजात शांतता व सलोखा निर्माण करावा, अशा सूचना अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री […]