google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात 365 जणांना डेंग्यूचा डंख

नाशिक : शहरात आरोग्य व्यवस्था संपूर्णतः डळमळीत झाल्याचे चित्र आहे. साथीच्या रोगांच्या प्रादुर्भावाने नाशिककर हैराण झाले आहे. जानेवारी 2024 पासून आजपर्यंत तब्बल 365 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नाशिक महापालिकेला डासांची उत्पत्ती स्थळे शोधून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात जुलै महिन्याच्या दहा दिवसातच 96 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या […]

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर; झिरवाळांच्या प्रयत्नांना यश

दिंडोरी येथील ३० खाटा क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार नरहरी झिरवाळ यांनी यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून दिंडोरी येथील ३० खाटा क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास […]

मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

मुंबई :- राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त […]

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून ११ दिवसांत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा

मुंबई, : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमातून गेल्या ११ दिवसांत ५ लाख १२ हजार ५५३ वारकऱ्यांवर विनामूल्य उपचार करण्यात आले आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. संत […]

डेंगूच्या महामारीत प्रशासनाचे दुर्लक्ष ; आयुक्तांनासमोर नागरिकांनी मांडली व्यथा

नाशिक रोड विभागीय आयुक्तांनासमोर नागरिकांनी मांडली व्यथा डेंगू सारख्या महामारी मध्ये प्रशासनाने परिसरा मध्ये लक्ष द्यावी तसेच शौचालयाची दुरुस्ती, किटकनाशक फवारणी यांसारख्या मोहिम परिसरात राबवण्यात याव्यात यासाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील रहिवाशांनी नाशिक रोड विभागीय आयुक्त मा.तुषार आहेर यांना निवेदन दिले. वाढत्या डेंगूचे रुग्ण आणि परिसरात होणारी शौचालयाचे दुरावस्था व दुर्गंधी यामुळे नागरिकांचा आरोग्याच्या […]

नाशिकमध्ये डेंग्युचा प्रादुर्भाव वाढला…

नाशिकमध्ये डेंग्युचे 96 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 365 वर पोहोचला आहे. सिडको विभागात सर्वाधिक म्हणजेच 38 रुग्ण आढळले आहेत. तर नाशिकरोड भागात 21, नाशिक पूर्व भागात 15 नाशिक पश्चिम पंचवटी भागात 10 तर सातपूर भागात 2 रुग्ण आढळले आहेत. डेंग्युवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नागरिकांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा खासगी […]

कोकण, विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता !

राज्यात कोकण आणि विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील […]

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच काही जिल्ह्यांतील धरणांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे पाणी टंचाईपासून त्या जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यांनतर आता पुन्हा एकदा पुढील तीन दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाने […]

दक्षिण मुंबईतील नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्व‍ित

मुंबई, दि. ४ : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई येथे सन २०१२ मध्ये मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्व‍ित होत आहे. विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करुन, आपल्या दालनात सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठका निमंत्रित करुन, बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तातडीने कार्यान्व‍ित करण्याचा मार्ग प्रशस्त केल्याने […]

आवक घटल्याने मुंबईत टोमॅटोचे दरशतक

आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळीने टोमॅटोची स्थानिक पातळीवरील आवक घटली आहे. याचा परिणाम मुंबईला रोज पाठविल्या जाणाऱ्या मालावर झाला आहे. यामुळे बाजारातील दर किलोला शंभरच्या आसपास आहेत. यंदा उन्हाचा पारा चाळिशीच्या वर राहिल्याने टोमॅटोच्या उत्पादनास त्याचा मोठा फटका बसला आहे. यंदा या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी लागवडीतील टोमॅटोच्या रोपांना फुटवे कमी प्रमाणात आले. ऊनपावसाच्या खेळाने करपा […]