google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत […]

मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र आनंद झाला आहे. परभणी बाजारपेठेत टॉमेटोचे भाव प्रति किलो ८० ते १०० रुपयांना विकले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसला आहे. टॉमेटोच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या घरात टॉमेटो […]

कांदा,कापूस,सोयाबीन दराचा प्रश्न अखेर मार्गी लागणार

कांदा कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढउतारामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि पर्यावरण संतुलन टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांच्या भेटीत केली आहे. २०२१ ते २०२४ या काळादरम्यान महाराष्ट्रामध्ये कापूस सोयाबीन आणि कांदा या पिकांच्या बाजारभावामध्ये चढ-उतार झाल्यामुळे […]

 घोटी, इगतपुरीला मध्यम पाऊस…

भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात दोन दिवस आषाढ सरींनी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काल शुक्रवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. त्यामुळे दोन्ही धरणांमध्ये नवीन पाण्याची वाढीव आवक सुरू झाली आहे. पावसाळी वातावरण टिकून असून जनजीवन पुन्हा गारठू लागले आहे. या पावसामुळे भात आवणीचे काम थंडावले होते. ते पुन्हा सुरू झाले आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने धरणात गत […]

मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे, मुसळधार पाऊस

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे आहेत. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 36 तासात मुंबईत 200 मिमी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. अंधेरी सबवे खाली 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळं अंधेरी सबवे […]

नाशिक जिल्ह्यात चिंतेचे ढग कायम; जून मध्ये असमाधानकारक पाऊस…!

हवामान विभागाकडून मागील दोन दिवसात मुसळधार पावसाचा दिलेला अंदाज मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी खरा ठरला असला, तरी नाशिक जिल्ह्यात मात्र वरुणराजा रुसला असल्याचे चित्र आहे. जूनमध्ये साधारण १४४ मि.मी. पावसाची सामान्य स्थिती हवी होती; मात्र या अपेक्षा फोल ठरल्या. ९ जुलै अखेर जिल्ह्यात केवळ ८२.७ टक्केच पाऊस झाला आहे. ९३३.८ टक्के पाऊस सप्टेंबर अखेर अपेक्षीत […]

मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी…

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  मुंबई आणि रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.  मुंबईसह पालघर, ठाणे, […]

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी; प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

मुंबईकरांवरचं पाणी संकट दूर होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. भातसा धरण क्षेत्रात 237 मिलिमीटर, तानसा धरण क्षेत्रात 120 मीमी, विहार धरण क्षेत्रात 26 मिमी, तुळशी धरण क्षेत्रात 32 मिमी, तर मध्य वैतरणा धरण क्षेत्रात 48 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. बारवी […]

 मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस…

मुंबई; केरळ ते कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे कोकण अन् घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे. गेल्या २४ तासांत माथेरानमध्ये २२० मि.मी. पाऊस झाल्याने हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद तेथे झाली आहे. विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर […]

कोकण, विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता !

राज्यात कोकण आणि विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील […]