नाशिक :- ‘प्रोत्साहन फाऊंडेशन’ आणि लाडशाखीय वाणी समाज, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने नुकत्याच आयोजित सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात नाशिकच्या ‘गोदामाई प्रतिष्ठान’च्या नाशिक कार्याध्यक्षा सृष्टी देव यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रानिवसा सईबाई यांच्या वेशभूषेत सृष्टी यांनी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हा राज्य पुरस्कार स्वीकारला.
सृष्टी या ‘गोदामाई प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ‘गोदावरी नदी स्वच्छता अभियान’ राबवित आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यपुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सृष्टी यांना राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘गोदामाई प्रतिष्ठान’ चे गणेश वैश्य काका, आबासाहेब देव, दीपक पाटील, रतन काळे, श्याम जन्नवरे, रेखा जन्नवरे, प्रफुल्ल काळे, सुभाष कुलकर्णी, हेमंत शिंदे, गौरी देव, संस्कृती देव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.