मान्यवरांच्या हस्ते 2024-25 या वर्षीच्या मराठा वधू – वर सुचीचे प्रकाशन
नाशिक :- नाशिक मेनरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंगल कार्यालय संचलित स्नेहबंधन बहुउद्देशीय संस्था आणि अखिल भारतीय मराठा महासंघ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठा समाजातील विवाहेच्छूक वधू-वर परिचय मेळावा भावबंधन मंगल कार्यालय, हनुमानवाडी, पंचवटी येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर सुनीलभाऊ बागुल, वसंतराव गिते, हंसराज वडघुले, ऍड. नितीन ठाकरे, रंजन ठाकरे, स्नेहबंधन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रमेशकाका भोसले, दत्तात्रय जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, नानासाहेब बच्छाव, संजय फडोळ, राजेंद्र शेळके, स्वातीताई जाधव, नवनाथ मामा झनकर, मदन शिरसाठ, प्रभाकर दिंडे, सुरेश माळोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष रमेशकाका भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 2024-25 या वर्षीच्या मराठा वधू – वर सुचीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुचीसाठी अतिशय मेहनत घेणारे श्री गणेश एंटरप्राइजेसचे नवनाथ मामा झनकर, शिवचैतन्य प्रिंटर्सचे अमोल शिरसाठ आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आबा पवार यांचा शाल, श्रीफळ, पुष्प देऊन सुनीलभाऊ बागुल, वसंतराव गिते आणि हंसराज वडघुले यांनी केला.
प्रास्ताविकात अविनाश वाळुंजे यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या पुढचं पाऊल या पुस्तिकेची माहिती उपस्थितांना करून दिली.

उपस्थित मान्यवरांनी यावेळी स्नेहबंधन संस्थेच्या कार्याचा गौरव करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन असेच कार्य समाजासाठी सुरू ठेवावे असे सांगितले. सामाजिक बांधिलकी ठेवून प्रत्येकाने आपले दायित्व निभावणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील आर्थिक विषमता, शेतकरी विवाहेच्छूक मुलांच्या विवंचना मांडल्या. समाजाने जागृत होऊन एकसंघ राहण्याचे प्रतिपादन त्यांनी केले. लग्नासाठी लागणारा जास्तीचा खर्च न करता नवदाम्पत्याच्या भावी आयुष्यासाठी तरतूद करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. समाजातील मुले, मुली उच्चशिक्षित होताहेत ही समाजासाठी अतिशय अभिमानाची बाब असून वैवाहिक आयुष्यासाठी जोडीदार शोधतांना अनेकदा अतिचिकित्सकवृत्तीमुळे मुलांची आणि मुलींची लग्न जमत नसल्याने मुलामुलींची वय वाढत असल्याचे खंत त्यांनी बाळगली. विवाह करताना तडजोड करणेही महत्वाचे असते, प्रत्येकाला अगदी आपल्या मनाप्रमाणे जोडीदार मिळणे कधीच शक्य नसते. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन आयुष्यात आनंदी राहावे अशी सदिच्छा मान्यवरांनी व्यक्त केली.
दरवर्षीप्रमाणे वधू आणि वर तसेच पालकांसाठी स्नेहबंधन बहुउद्देशीय संस्था प्रबोधनात्मक संदेश देण्यासाठी वक्ते आमंत्रित करत असते. यावर्षी अर्पण रक्तपेढीच्या डॉ. किरण जाधव यांना संस्थेच्या वतीने विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी थॅलेसेमिया या रक्त आजाराची माहिती देऊन प्रत्येक वधू आणि वराने चाचणी करण्याचे आवाहन केले. तसेच अर्पण रक्तपेढीत रक्तदान केल्यास थॅलेसेमिया चाचणी मोफत करून देण्याची संयोजकांनी केलेली मागणी मान्य करत असल्याची घोषणा त्यांनी केली.
कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी योगेश नाटकर पाटील, सुभाष शेळके, सचिन भोसले, रमेश खापरे, , शिवाजी दिंडे, नानासाहेब जगताप, अशोक देवकर सर, हिरामण वाघ, अरुण पळसकर, उदय देशमुख, गौरव गाजरे, सागर कातड, ज्ञानेश्वर पळसकर, शरद प्रभाणे, तुळशीदास पवार, विवेक कदम, अशोक पवार, गणेश पाटील, सचिन हांडगे, राम निकम, विवेक घडुसे, रश्मीताई भोसले, शोभाताई सोनवणे, चारुलता सूर्यवंशी, विलास गडाख, विश्वास वाघ, ज्ञानेश्वर सुरासे, प्रकाश उखाडे, नितीन खैरनार, शैलजाताई चव्हाण, रुपाली सोनवणे, ज्ञानेश्वर जगळे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर बोजगे, मनोहर शिरसाठ, रमेश खापरे, पुंडलिक घुले, जयवंत आण्णा पाटील, रंगनाथ शिरसाठ, दिपक थोरात, अरुण शेळके, संजीवनीताई वाघ, तुकाराम वाघ, विलास जाधव, अनिल आहेर, महेंद्र दळवी, अमोल शिरसाठ, सागर बागुल, अरुण भवर, सी. ए. प्रतीक गरुड, नानासाहेब हांडगे, नितीन काळे, भूषण काळे, वैभव वडजे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वाळुंजे यांनी केले.आभारप्रदर्शन प्रभाकर दिंडे यांनी केले. विवाहेच्छूक वधू-वरांचा परिचय प्रभाकर दिंडे, दत्तात्रय जाधव, अविनाश वाळुंजे यांनी करून दिला.