माध्यम प्रतिनिधींसाठी ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालयात राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक – राजयोग शिक्षण व शोध प्रतिष्ठानाच्या मीडिया प्रभागातर्फे दि. 26 ते 30 सप्टेंबर, 2024 रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू, राजस्थान येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वस्थ आणि सुखी समाजासाठी अध्यात्मिक सशक्तीकरण : मीडियाची भूमिका या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात क्षेत्र, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदितील प्रतिनिधींचा यात सहभाग असेल.
प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या धकाधकीच्या जीवनात सुख शांतीचे काही क्षण जोडावे सोबतच आध्यात्मिक जनजागृतीचे ते अग्रदूत व्हावेत या उद्देशाने सर्व मीडिया प्रतिनिधींना या मीडिया कॉन्फरन्स मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण नाशिक जिल्हा मुख्य सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू:
अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू कडे जगातील नैसर्गीक आणि आध्यात्मिक उर्जेचे प्रमुख शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. आबू येथे सुंदर पर्वतराई, तलाव, धबधबे, बगीचे आदि नैसर्गीक पर्यटन स्थळाबरोबर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना म्हणून देलवाडा, अचलगढ, गुरुशिखर, आबू अंबाजी देवी, पीस पार्क, ज्ञानसरोवार, पांडवभवन, शांतीवन, विशाल ग्लोबल हॉस्पिटल आदि विविध आध्यात्मिक , नैसर्गीक पर्यटन स्थळ सुद्धा आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सर्व उपरोक्त क्षेत्राशी संबंधित प्रसार माध्यम प्रतिनिधींनी (बिके दिलीप बोरसे)-8830781810, (बी के राजन राजधर) 98234 55307 या मोबाईलवर संपर्क करून निशुल्क नोंदणी करावी असे आवाहन मीडिया समन्वयकांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427