भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दिला विश्वास
महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा भाजपचे युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते करणार प्रचार
पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी आम्ही उदय सामंत बरोबर:- भाजपा कार्यकर्ते
रत्नागिरी :- दि.२१ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी मधील भाजपा युवा कार्यकर्त्यांनी रत्नागिरी मध्ये सुरू असलेले राजकारणला कंटाळून आज महायुतीमधील भाजपा युवा कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांची भेट घेत त्यांचे समर्थन केले.रत्नागिरी विधानसभाचे महायुती तिकीट हे उदय सामंत यांना मिळणार या आनंदाने महायुतीचे कार्यकर्ते उदय सामंत यांची भेट घेऊन सक्रिय होत प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आज महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आणि राज्यात महायुतीचे सरकार आण्यासाठी रत्नागिरीतील महायुतीचे उमेवार उदय सामंत यांचे सर्मथन करण्याचा निर्णय भाजपा युवा कार्यकर्त्यांनी घेतला.उदय सामंत यांना १ लाख मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपाच्या युवकांनी निर्धार करत आज उदय सामंत यांची भेट घेतली.रत्नागिरीतील राजकारणाला कंटाळून आज त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे उदय सामंत यांनी स्वागत केले असून त्यांना कामाला सुरवात करण्यास परवानगी दिली आहे.रत्नागिरी मध्ये चालू असलेल्या राजकारण्याचा पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे कार्यकर्ते म्हणाले.
यावेळी वैभव उर्फ सोनू रसाळ ,अनिरुद्ध भुते,अमेय मसूरकर, मेहता साखरकर ,राजा सावंत ,हर्षद धूळप ,सचिन वायंगणकर,साईप्रसाद कुटेकर ,सुमित घोसाळकर, विराज कुमठेकर ,अमेय घोडे, कोमल रहाटे, मीना जाधव ,वैदही गुरव ,नंदनी पवार, सविता पवार ,सलोनी जाधव, स्वप्नाली जाधव, यांच्या सहित शेकडो लोकांनी आज उदय सामंत यांची भेट घेतली.