मध्य नाशिकमध्ये मुस्लीम आमदारासाठी दलित-मुस्लीम एकजुटीचे आवाहन – मुशीर सय्यद

author
0 minutes, 1 second Read

नाशिक – “आता प्रस्थापित पक्षांना मतदानाचा वापर करायला देणार नाही, मध्य नाशिकमधून मुस्लीम आमदार निवडून आणण्यासाठी आणि जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे,” असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मुशीर सय्यद यांनी दलित-मुस्लीम समाजाला एकजूट ठेवण्याचे आवाहन केले. अशोका मार्गावरील जलसा हॉलमध्ये आयोजित मेळाव्यात सय्यद यांनी शिवसेना ठाकरे गट, भाजप, आणि महाविकास आघाडीवर कडाडून हल्ला चढवला.

सय्यद यांनी गेल्या वर्षीच्या उपनगरातील घटनांचा उल्लेख करत, भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पैगंबर साहेबांबद्दल करण्यात आलेल्या अपमानजनक पोस्टवरून मुस्लिम समाजाला चुकीच्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच जुन्या नाशिकच्या दंगलीत भाजप व महाविकास आघाडीच्या लोकांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

“दलित-मुस्लिम समाजाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप”

सय्यद यांनी सांगितले की, लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, मात्र निवडून आल्यावर या नेत्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडले. दंगलीच्या वेळी संबंधित खासदाराला संपर्क साधल्यावर त्यांनी पोलिसांकडे जाण्याची भूमिका घेतली, ज्यामुळे समाजात नाराजी पसरली आहे.

“दलित-मुस्लिम एकजुटीची वेळ आली आहे”

सय्यद यांनी सांगितले की, मध्य नाशिकमध्ये सुमारे ८० हजार मुस्लीम व ५५ हजार दलित मतदार आहेत. दोन्ही समाजाने एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करावी, असे आवाहन सय्यद यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख वामन गायकवाड, ज्येष्ठ नेते संजय साबळे, आणि समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष इमरान चौधरी यांनी सय्यद यांना पाठिंबा दर्शवला.

“समाजासाठी न्यायासाठी संघर्ष करणार”

सय्यद यांनी मतदारांना आश्वासन दिले की, “माझी लढाई समाजाच्या न्यायासाठी आहे, आपण मला विधानसभेत पाठवा आणि मी तुमच्याविरुद्ध अन्याय होऊ देणार नाही.”

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427