विधानसभा निवडणूक २०२४: शाळांना १८ ते २० नोव्हेंबर सुट्टी जाहीर करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचे आदेश

author
0 minutes, 0 seconds Read

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर शाळांना १८, १९ व २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भात आदेश जारी केले आहेत.

शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, शिक्षकांना निवडणूक कार्यात सहभागी होण्यामुळे काही ठिकाणी शाळा भरवणे शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना या कालावधीत शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव, तुषार महाजन यांनी शिक्षण आयुक्तांना सुट्टीबाबतचे निर्देश दिले आहेत. संबंधित विभागांनी आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427