संगमनेरकरांनी लुटली फुलझडीत खरेदीची मजारोटरी क्लब, इनरव्हील क्लबच्या प्रकल्पाला संगमनेरकरांची पसंती

author
0 minutes, 0 seconds Read

संगमनेर (प्रतिनिधी)
रोटरी क्लब संगमनेर व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने आयोजित फुलझडी एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवार दि. १८ रोजी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनिष मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तसेच या एक्स्पोला आर्थिक रुपाने सहकार्य करणारे महालक्ष्मी नेक्सा शोरुमचे मॅनेजर तेजस पवार, कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनिल कडलग, ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक महेश मयूर आदि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
रविवार २० ऑक्टोबर पर्यंत मालपाणी लॉन्स येथे फुलझडीचे आयोजन केलेले आहे. पार पडलेल्या अनोख्या फुलझडी प्रकल्पाला संगमनेरकरांनी पसंतीची मोहर उमटवली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या या प्रकल्पात महिला, पुरुष व लहान मुलांचा विचार करुन विविध प्रकारचे स्टॉल संपूर्ण महाराष्ट्रातून आले होते.
रोटरी क्लब संगमनेर व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर या दोन्ही संस्था समाजसेवेसाठी ओळखल्या जातात, संगमनेर शहर व ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या उद्योजकांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने एक व्यासपीठ मिळावे तसेच नागरिकांनी एकाच ठिकाणी खरेदीचा आनंद घेता यावा या उद्देशाने हा दिवाळी मेळा आयोजित केल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे व इनरव्हील क्लबचे अध्यक्षा नेहा सराफ यांनी दिली.
या मेळ्यात १४० स्टॉल धारकांनी आपली दुकाने थाटली होती यामध्ये लेटेस्ट फॅशनमधील महिलांचे व पुरुषांचे कपडे, ब्युटी प्रॉडक्ट, लहान मुलांचे आकर्षक कपडे, हातमागावर तयार केलेले कपडे, पॅकिंग फुड, रोजच्या गरजेच्या वस्तु, फर्निचर मॉल, लज्जतदार खाद्यपदार्थ, दिवाळी सणाचे डेकोरेशन, सजावटीच्या वस्तू, दिवाळी लाईट, दिवे, आर्ट, क्राफ्ट, आरोग्याशी संबंधित स्टॉल, मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू यासारखे अनेक स्टॉल सहभागी झाले होते. या मेळ्यासाठी मिताली ब्रायडल वर्ल्ड व एक्स्पर्ट डेंटल क्लिनिक हे सहप्रायोजक होते. शेवटच्या दिवशी सर्व स्टॉलधारकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच यामध्ये स्टॉल धारकांतून उत्कृष्ट स्टॉलचे प्रथम तीन पारितोषीक देण्यात आले
या प्रकल्पाच्या यशस्वीततेसाठी प्रकल्प प्रमुख आनंद हासे, महेश वाकचौरे, महेश ढोले, अमित पवार, मधुसुदन करवा, डॉ. एकता वाबळे, सौ. प्रतिमा गाडे, रोटरी क्लबचे सेक्रेटरी विश्वनाथ मालाणी, खजिनदार विकास लावरे, इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी शिल्पा नावंदर, सेक्रेटरी नेहा सराफ, प्रकल्प समितीतील दिपक मणियार, अजित काकडे, नरेंद्र चांडक, डॉ. किशोर पोखरकर, सीए संजय राठी, ओंकार सोमाणी, योगेश गाडे, रविंद्र पवार, मयूर मेहता, ऋषीकेश मोंढे, संदीप फटांगरे, संजय कर्पे, सुनिल घुले, मोहित मंडिलक, रमेश पावसे, संतोष आहेर, ज्योती कासट, प्रीती फटांगरे, पिंकी शाह, राखी करवा, सिमा अत्रे, डॉ. शामा पाटील, सुनिता गांधी, श्वेता जाजू तसेच सर्व रोटरी क्लब सदस्य, इनरव्हील क्लब सदस्य काम पाहत आहेत. आयोजकांनी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरीकांचे या मेळ्यात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद मानले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427