google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

महाराष्ट्रातील गडकोट अतिक्रमण मुक्त करा.

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिकच्या शिवकार्य गडकोट संस्थेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पाठवले निवेदन.

नाशिक :- गडकिल्ल्याच्या संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळं दुर्लक्षा मुळं महाराष्ट्रातील ऐतिहाशिक गडकिल्ल्याचे अस्तित्वाला बाधा करणारे अनेक बेकायदा अतिक्रमण गडकिल्ल्यावर झाली आहे.विशाल गडासह राज्यातील अनेक दुर्गाना अश्या अतिक्रमणाचा विळखा आहे.यामुळे दुर्गभक्तांमध्ये,दुर्गसंवर्धन संस्थामध्ये संतप्त भावना आहेत,याबाबतीत तातडीने केंद्र, राज्य पुरातत्व, वन,महसूल व स्थानिक दुर्गसंवर्धन संस्थांची समिती गठीत करावी,सविस्तर अहवाल घेऊन राज्य सरकारने तातडीने अनधिकृत बेकायदा, इतिहासाला बाधा पोहोचवणारी अतिक्रमणे काढावी अशी मागणी नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवन्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी विलास वाघ यांच्या कडे ( दिनांक २६ जून रोजी)
सुपूर्द करण्यात आले.
दरम्यान नाशिकच्या रामशेज येथील परवानगी प्रकरणाचा संदर्भ देऊन
अश्या बेकायदा अतिक्रमनास परवानगी कोण देत? याबाबतीत चौकशी करावी सवाल ही या निवेदनात केला आहे.

 शासन व त्यांच्या प्रशासनाच्या दुर्लक्षाने  महाराष्ट्र राज्यातील अनेक दुर्गाची दुरवस्था झाली आहे, या कामी येणाऱ्या निधीची कामे ही दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांना माहित नसतात. कामे नित्कृष्ट होतात, किल्ले हातगड वर झालेली कामे ही वर्षात ढासळत आहे.पुरातत्व वन विभागाच्या नोंद वहीत दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांची साधी नोंद ही नाही.दरम्यान राज्य शासनाने स्थापन केलेल्या दुर्ग संवर्धन समितीत अनेक दुर्ग संवर्धन बाह्य मंडळींचा भरणा आहे ते कधीही दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या मूलभूत मुद्द्यावर संवाद ही करीत नाही,अश्या दुर्ग संवार्धनाशी संबंध नसलेल्या व्यक्तींना काढून अभ्यासू सक्रिय दुर्ग संवर्धन संस्थेचे प्रतिनिधी शासनाच्या दुर्ग संवर्धन समितीत घ्यावे, तसें आपण आदेश करावे अशे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राम खुर्दळ (दुर्गअभ्यासक तथा संस्थापक शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक)

  • गडकिल्ल्याच्या संवार्धनासाठी आम्ही त्यागाने कार्यरत आहोत, स्व खर्चाने मोठ्या कष्टाने दुर्गाचे अस्तित्व वाचवण्यासाठी दुर्ग संवर्धन संस्था राबतात, मात्र गडकोटाच्या भूमीत हे अतिक्रमण वाढले आहे, त्यामुळं गड म्हणून त्याचे महत्व कमी करण्याचा हा प्रकार आहे.जे जून आहे, पुरातन आहे ते ठेवा मात्र अनधिकृत पणे उभे राहिलेले गडकिल्ल्यानवरील अतिक्रमणे काढावी ही समस्त दुर्गसेवकांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *