google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध

author
0 minutes, 3 seconds Read

मुंबई, दि. २५ : विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदारांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई शहर निवडणूक शाखेने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील  मतदारांना मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्र संदर्भात माहिती  देण्यासाठी 022-20822693 हा हेल्पलाइन क्रमांक तसेच https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे मुंबई शहर, जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *