google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

ॲक्शनपॅक्ड “क्लब 52” चित्रपटाचा धमाकेदार टीजर रिलीज

author
0 minutes, 0 seconds Read

फक्त पत्त्यांचा नाही, हा खेळ आहे

डेरिंगचा हार्दिक जोशी दमदार भूमिकेत

नाशिक :- दमदार स्टारकास्ट असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित कोळी दिग्दर्शित हा चित्रपट अॅक्शनपॅक्ड असून, हार्दिक जोशी धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे.

कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन “क्लब 52” या चित्रपटाला देण्यात आली आहे. टीजरवरून पत्त्यांचा डाव आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचा अंदाज बांधता येतो. चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे. अॅक्शनपॅक्ड टीजरमुळे कथानकाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *