google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दीन साजरा…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचलित नाशिक, रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, कुणाल प्राथमिक विद्यालय, बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दीन साजरा करण्यात आला .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब पटाईत कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी नगरसेविका मा.कविताताई कर्डक ( मनपा नाशिक) तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ – 1 नाशिक शहर,मा. किरणकुमार बाबाराव चव्हाण संस्थेचे अध्यक्ष वामनरावजी गायकवाड , संस्थेचे प्रभारी सरचिटणीस मा.नितीनजी भुजबळ साहेब, संस्थेचे सरचिटणीस डॉ. संजय जाधव शालेय समिती अध्यक्ष श्री. गोविंदरावजी कटारे, कुणाल प्राथमिक विद्यालय शालेय समिती अध्यक्ष श्री. करुणासागर पगारे, सदस्य अशोक रावजी मोरे सदस्य श्री. भाऊसाहेब कसबे, श्री एकनाथ मोरे, ॲडव्होकेट उत्तम गांगुर्डे श्री. दाहिजे कार्यक्रमासाठी उपस्थित होते

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी तसेच संस्थेचे पदाधिकारी, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय शिंदे व पर्यवेक्षक श्री संदीप पांडे तसेच कुणाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय अहिरे सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या उपशिक्षिका सुमंगला शिंदे मॅडम यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. प्रभाकर चव्हाण सर यांनी केले. कार्यक्रमात इयत्ता 9 वी ब वर्गातील विद्यार्थिनींनी व मार्गदर्शक वर्गशिक्षिका शकुसुम पवार मॅडम तसेच सजावट चित्रकला शिक्षक श्री.संदीप पांडे सर यांनी तयार केलेली कलिका प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.


कार्यक्रमासाठी रमाबाई आंबेडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कुणाल प्राथमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमात इयत्ता सहावीची कुणाल प्राथमिक शाळेची रक्षंदा भालेराव , इयत्ता दहावीची रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयची विद्यार्थिनी तेजस्विनी निकम इयत्ता बारावीची रमाबाई आंबेडकर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आरती आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण केले. पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व नगरसेविका मा.कविताताई कर्डक , संस्थेचे सरचिटणीस डॉ. संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच कार्यक्रमाच्या भाषणाचा शेवट कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नानासाहेब पटाईत यांनी केला.
आजच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे आंतरशालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दिंडोरी रोडवरील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हर्षल हनुमंते यांनी पुरस्कृत केल्या आहे. स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक वंदना भालेराव, डॉ. संध्या पवार,गांगुर्डे मॅडम व कुमारी स्वीटी गायकवाड यांचे सहकार्य लाभले. तसेच परीक्षकांचा परिचय श्रीमती.माधुरी जाधव मॅडम यांनी करून दिला


प्रमुख पाहुण्याचे व उपस्थितांचे आभार उपशिक्षिका रूपाली जोपुळकर मॅडम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय शिंदे सर व पर्यवेक्षक संदीप पांडे सर, कुणाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अहिरे सर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *