google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

author
0 minutes, 0 seconds Read

मुंबई : शासकीय कर्मचारी आणि अधिकारी संघटनेकडून निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करावा अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासंबंधी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. या मागणीला मात्र विद्यार्थी संघटनांचा आणि शासकीय नोकर भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांकडून कडाडून विरोध केला जातोय. त्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासकीय नोकरदारांचे निवृत्त होण्याचे प्रमाण कमी होईल
राज्यातील परीक्षार्थी उमेदवार, विद्यार्थी शासकीय नोकर भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर एक प्रकारे या निर्णयामुळे अन्याय होईल असे स्टुडन्ट राईट असोसिएशन यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहून सांगण्यात आलं आहे. सेवानिवृत्ती वय 60 वर्षे केल्यास कर्मचाऱ्यांचे निवृत्त होण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी नवीन तरुणांना मिळणारी सरकारी नोकरीतली संधीसुद्धा कमी होईल. पर्यायाने बेरोजगारी वाढेल असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *