google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

गृहिणीचे किचन बजेट बिघडले! फळभाज्या महागल्या

author
0 minutes, 0 seconds Read

मान्सूनच आगमन यंदा वेळेत झालं असली तरी पावसाने सध्या दांडी मारलीय. त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढलाय. त्यात मध्यंतरी मान्सूनपूर्व म्हणजे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाले होते. अशात पुन्हा एकदा बदलत्या वातावरणाचा फटका हा शेतकऱ्यांसोबत गृहिणीच्या किचन बजेटला बसतोय. कारण पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव वधारले आहेत. कारण मार्केटमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाली असून सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर घसरली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर भागातून पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक होते. तर बाजार समितीने खरेदी केलेला शेतमाल हा मुंबईसह, गुजरात अहमदाबादला पाठवण्यात येते. तर त्यातील काही माल हा स्थानिक विक्रीसाठी व्यापारी बाजारातून माल खरेदी करतात. मुळातच बाजार समितीत पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे सर्वांच फटका बसलाय. 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *