google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

शिंदे टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा पाहून खा.गोडसे संतप्त. विना टोल सोडली शेकडो वाहने

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- शिंदे येथील टोल नाक्यावर टोल प्रशासनाच्या गलथन कारभारामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहून खासदार गोडसे यांनी रौद्र रूप धारण केले.गाडी खाली उतरत खासदार गोडसे यांनी टोल प्रशासनाला धारेवर धरले.महामार्गावर दोनही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असूनही तुम्ही टोल वसुलीत मग्न कसे असा सवाल करत संताप व्यक्त केला.खासदार गोडसे यांनी तासन् तास महामार्गावर उभे असलेले वाहने टोल नाक्यावरून विना टोल सोडले. खासदार गोडसे यांनी रस्त्यावर उतरत टोल प्रशासनाला धडा शिकवल्याने प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला.

शिंदे येथील टोल प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशी आणि वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे.टोल प्रशासनाच्या विरोधात शासनाकडे अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत.खासदार गोडसे यांनी यापूर्वी टोल प्रशासनाच्या विरोधात शासनाकडे केली होती.सततच्या तक्रारीची दखल घेत शासनाने यापूर्वी टोल प्रशासनाला कोट्यावधींचा दंडही आकारलेला आहे. असे असूनही टोल प्रशासनाची मनमानी सुरूच आहे.

आज सकाळी खा.गोडसे हे सिन्नर तालुक्याचा दौरा आटपून नाशिकरोडच्या दिशेने येत असताना त्यांना शिंदे टोल नाक्यावर वाहनांच्या दुर्तफा लांबच लांब रांगा दिसल्या.बराच वेळ उलटूनही महामार्गाच्या दोन्ही बाजूला दोन -दोन किलोमीटर अंतरावर लागलेल्या वाहनांच्या सांगा कमी होताना दिसत नसल्याने खा.गोडसे संतप्त झाले. खासदार गोडसे यांनी टोल नाक्यावर गाडी थांबवत टोल प्रशासनाला वाहनांच्या लागलेल्या रांगांविषयी जाब विचारला.वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असूनही तुम्ही या परिस्थितीकडे लक्ष न देता टोल वसुली करण्यात मग्न कसे असा सवाल करत खासदार गोडसे यांनी टोल प्रशासनाला धारेवर धरले.एवढ्यावरच न थांबता खासदार गोडसे यांनी महामार्गावर उभे असलेले वाहने टोल नाक्यावरून विना टोल सोडले.टोल प्रशासनाने यापुढे प्रवाशांची कुचंबनाही होणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे अन्यथा टोल प्रशासनाला कधी न०हे असा धडा शिकविण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी खा. गोडसे यांनी दिला आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *