google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

जुन्या नाशिक पाठोपाठ ध्रुवनगर भागात गाड्यांची तोडफोड नागरिकांमध्ये भीतीच्या वातावरण…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- जुना नाशिक परिसरात वाहनांच्या तोरफोडीला दोन दिवस उलटत नाही तर आता गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत ध्रुव नगर येथील खंडोबा मंदिर येथे धक्कदायक घटना समोर येत आहे. गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील ध्रुव नगर खंडोबा मंदिर परिसरात अज्ञात आरोपींनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून वाहनांची तोडफोड केल्यानंतर संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे.रविवारी जुन्या नाशिक परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली होती, त्यानंतर आता गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर टिमसह दाखल झाले होते.पोलिसांनी संशयितांना लवकर अटक करावी असे नागरिकांकडून सांगण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *