google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

पायी दिंडीत थेट ट्रक संगमनेर_महामार्गांवर मद्यपी ड्राइव्हर,चार वारकऱ्यांचा जागीच अंत ..

author
0 minutes, 0 seconds Read

पुणे नाशिक महामार्गांवर भरधाव वेगात वारकऱ्यांना चिरडले.

खंदरमाळ परिसरातील एकोनाविस मैलावर भीषण अपघात.

पायी दिंडीत थेट ट्रक घुसला.चार जनांचा जागीच मृत्यू.

अनेक वारकरी गंभीर जखमी.तर काही किरकोळ जखमी.

दुर्दैवी घटना. दिंडी सोहळा थांबला.

शिर्डीहून कशिकानंद महाराज यांची दिंडी आळंदीला निघालेली.

महाराष्ट्रात शोक व्यक्त.नगर जिल्ह्यातील शोककळा.

संगमनेर :- संगमनेर तालुक्यातील पठार भागात नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील 19 मैल परीसरात रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी 4 वाजताच्या सुमारास मद्यपि ड्राइव्हरला डुलकी लागली.आणि कंटेनर वाहन थेट रस्त्याचे कडेने जाणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यात घुसला.वारकऱ्यांना उडवले, यात काही वारकरी गाडीखाली गेले,त्यात चार जण जागेवर ठार झाले तर काही गंभीर जखमी झाले,तसेच काही किरकोळ जखमी झाले.आणि एकच कल्लोळ माजला.होत्याचे नव्हते झाल्याने वारकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले.या अपघातात चार निष्पाप वारकऱ्यांचा दुदैवी मृत्यू झालाय.या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जातीय तर अहमदनगर जिल्हयात शोककळा पसरलीय.

  दरवर्षी प्रमाने कार्तिकी एकादशी वारीसाठी शिर्डीहून कशिकानंद महाराज यांचा पायी दिंडी सोहळा देवाची आळंदी येथे जाण्यास 30 नोव्हेंबर रोजी निघाला होता.जागोजागी मुक्काम करत हरिनामाच्या गजरात साईबाबा पालखीसह दिंडी सोहळा मार्गक्रमण करत होता.3 डिसेंबर रोजी संगमनेर येथील चंदनापुरी गावात उत्तम अरगडे यांचेकडे रात्रीचा मुक्काम करून दिंडी आळंदी देवाची यात्रेला सकाळीच प्रस्थान झाली.तर संध्याकाळचा मुक्काम घारगाव येथे सूनीच्छित होता. घारगाव फक्त 2 किलोमिटर दूर असताना ही दुर्दैवी घटना घडलीय.

 हरिनामाच्या गजरात नाशिक – पुणे महामार्गावरून मार्गक्रमन करतं असताना संगमनेर कडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा  कंटेनर क्रमांक mh 12 vt 1455 पाठिमागून येत असताना मद्यपी कंटेनर चालकास डुलकी लागल्याने वाहन थेट दिंडी सोहळ्याच्या पालखीत घुसल्याने मोठा अनर्थ घडलाय.तर वारकऱ्यांमध्ये एकच धावपळ उडालीय.

तर या अपघातात ताराबाई गंगाधर गमे राहणार कोऱ्हाळे ता राहता, अहमदनगर,बबनराव पाटीललबा थोरे राहणार द्वारकानाथ शिर्डी अहमदनगर ,भाऊसाहेब नाथा जपे राहणार कनकोली तालुका राहता अहमदनगर,बाळासाहेब अर्जुन गवळी राहणार मढी, तालुका कोपरगाव अहमदनगर अशा चार वारकऱ्यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झालाय.

  तर बिजलाबाई शिरोळे राहणार वाळकी तालुका राहता अहमदनगर, राजेन्द्र कारभारी सरोदे राहणार मढी तालुका कोपरगाव अहमदनगर, भाऊसाहेब दशरथ गायकवाड व ओमकार नवनाथ चव्हाण दोघे राहणार राहणार मढी तालुका कोपरगाव अहमदनगर, निवृत्ती पुंजा डोंगरे राहणार पंचाळा तालुका सिन्नर नाशिक, शरद सचिन चपके राहणार परभणी, अंकुश ज्ञानेश्वर कराळ राहणार अकोला, मीराबाई मारुती ढमाले राहणार वावी तालुका सिन्नर नाशिक अशी जखमी वारकऱ्यांची नावे समजलीय.

    गंभिर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आळेफाटा , संगमनेर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर किरकोळ जखमींवर घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे यंत्रणेने जागेवरच उपचार केलेत.तर काही स्वताहून उपचारासाठी जागोजागी हॉस्पिटल मध्ये पोहचलेत.तर काही वारकऱ्यांनी पुन्हा माघारी घरी जाणे पसंद केलय.

घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी तसेच महामार्ग पोलिस प्रशासन, घारगाव पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, सामाजिक कार्यकर्ते,समाजसेवक यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले सुरू केले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय तर अहमदनगर जिल्हयात शोककळा पसरलीय.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *