google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

शिवराज्याभिषेक दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमान राजकारभाराचे स्मरण करण्याचा सुवर्ण सोहळा . करण गायकर

author
0 minutes, 0 seconds Read

आपला महाराष्ट्र वृत्त :- नाशिक शिवतीर्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा छावा क्रांतिवीर सेना विश्व हिंदू मराठा महासंघ नाशिक व नाशिक मधील शिव भक्तांच्या वतीने जिल्हाधिकार्यालयासमोरील अश्वारूढ शिवछत्रपतींच्या स्मारकस दुग्धाभिषेक पुष्पवृष्टी करत फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर प्रदेश युवा अध्यक्ष शिवा तेलंग शेतकरी नेते नानासाहेब बच्छाव युवा नेते अमोल पाटील छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर वैभव दळवी विद्यार्थ्याकडे जिल्हाप्रमुख संदीप फडोळ भारत पिंगळे किरण लवंड महिला आघाडीच्या संगीताताई सूर्यवंशी सविता वाघ पूनम पाटील ममता शिंदे आकाश हिरे विकास गुळवे सागर फडोळ रवी धोंगडे विकास धोंगडे आदीसह शिवभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.


यावेळी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करताना करण गायकर यांनी सांगितले की
रयतेचे हित लक्षात घेऊन शासन करण्याचा आदर्श परिपाठ महाराजांचे चरित्र आपल्याला देते.राज्याभिषेक दिनानिमित्त हाच आदर्श डोळ्यांपुढे ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी वाटचाल सुरू ठेवूया.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत.महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण,अवघा महाराष्ट्र शिवमय करणारा मंगल सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.या ऐतिहासिक दिनी स्वराज्य स्थापनेवर सार्वभौमत्वाची मोहोर उमटवणारे प्रजाहितदक्ष राजे,छत्रपती शिवाजी महाराज यांना शत शत नमन.
जोवर भारतातल्या माणसांच्या मनात रयतेच्या कल्याणकारी राज्याची आस आणि संकल्पना जिवंत राहील,जोवर इथल्या माणसांच्या मनात माणुसकी,कणव,बंधुभाव राहील तोवर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव मनामनात कायम राहील.आपल्या सगळ्यांना या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा

यावेळी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कीहज़ारो वर्षा पासून असलेल्या ग़ुलामीला एक नवीन पहाट दिली ,एक नवीन सुर्योदय दिसला तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने कित्येक हिंदूनी यात आपल्या जीवाच्या अहुत्या दिल्या.तेव्हा कुठे शिवतख्त उभे राहिले परकीय सत्ताधारी मुस्लिम मुग़ल आदिलशाही निजामशाहीचा विरोध तर होताच, त्यात स्वधर्मतीलच बामणांनी या राज्यभिषेकला केलेला विरोध हे पन तेवढेच सत्य आहे, या पुढ़े हिंदूंनी शैषणिक,सामाजिक,राजकिय स्तरावरही प्रगति केली पाहिजेत,तसेच आपल्यातला जातिवाद संपऊन सर्व स्तरावरील हिंदूंना सहकार्य केल पाहिजेत, आपल्यातला गोरगरीब जनतेची जागृती होऊंन तो प्रगतिशील झाला पाहिजेत,त्याला उद्योगा मध्ये,शिक्षणा मध्ये सहकार्य केल पाहिजेत,आपन एकजुट एक संघ हिंदू होऊन जगले पाहिजेत,अंधश्रद्धा,पाखंड या गोष्टींना थारा न देता विद्याननिष्ठ असलो पाहिजेत,भगव्याला आणि देशाला आपन आपल जीवन समर्पित केल पाहिजेत.या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू मराठा संघाचे पवन महाराज चोथे,भावेश बागुल,रोशनी सूर्यवंशी,गोकुळ पानसरे इंडियन आर्मी , मयुर मराठे,मयुर पाटील,इंद्रायणी कोकाटे,वैष्णवी राजोळे,राम दाते,भाऊसाहेब पिंगळे,यांनी मेहनत घेतली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *