google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

रामशेज वरती छत्रपती शंभूराजेचा जन्मोत्सवं सोहळा मोठ्या थाटात संपन्न..

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- सडारांगोळी काढलेल्या रामशेजच्या हत्तीदरवाजाची हार फुलांनी,भगव्या तोरणानी केलेली सजावर,गडावर बेल भंडाऱ्याची चादर करुण त्यावर छत्रपती शिवराय, शंभूराजेच्या प्रतिमा,श्रमदानं साहित्याची मांडणी, शिवराई सह गडकोट पुस्तिकेची मांडणी,सह पहाटे ५ वाजेपासून गडावर ध्वजारोहन,गडपूजन, किल्ल्यावरील देवदेवतांची पूजा विधी,

यासोबत १६८२ सालच्या रामशेजच्या अजिंक्य लढ्याचे स्मरण,गडमित्र पुरस्काराचे वितरण,नीटकेटके नियोजनात गडकिल्ले वाचवण्याचा सामूहिक संकल्प करुण (दि.१४ में २०२४ रोजी) किल्ले रामशेजच्या माथ्यावर छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव इतिहासाच्या भारलेल्या वातावरणात झाला.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक जिल्हावतीने यंदा ही १६ व्या वर्षी किल्ले रामशेजवर छत्रपती शंभूराजे जन्मोत्सावनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.पूर्व संध्येला गडस्वच्छता,फुलांचे तोरणाचे हार बनवणे,रात्री गडजागर, व पहाटे ५ वाजता किल्ले रामशेजच्या दक्षिण ध्वजस्तंभ येथे भव्य भगव्याध्वजाचे रोहन,पहाटे हत्तीद्वाराची हार फुले, भगव्या तोरणानी सजावट,छत्रपती शंभूराजेच्या जन्मोत्सवाला चुण्याचा ऐतिहासिक घाना येथे बेल भंडाराफुले वाहून गडपूजन,व त्यानंतर सकाळी सात ते ९,३० पर्यंत विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून हतगड किल्ल्याचे शिवकालीन किल्लेदार विर गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांचे १३ वे वंशज मनोहर मोरे देशमुख,नानी संग्राहक,इतिहास लेखक संजय बिरार,ग्रामीण साहित्यिक,डोंगर, निसर्ग संवर्धक देवचंद महाले यांचे हातून छत्रपती शिवराय, युवराज शंभूराजे,श्रमसाहित्य,शिवराई, गड पुस्तिका पूजन फुले वाहून झाले. त्यानंतर शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या २४ वर्षे अखंडित दुर्ग संवर्धन कार्याची सविस्तर मांडणी, पाहुण्यांचा परिचय संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी केली,त्यानंतर झालेल्या मनोगतात संजय बिरार यांनी सांगितले कि,रामशेजवर दुसऱ्यांदा येण्याचे भाग्य शिवकार्य मूळ मिळाले, इतकी शिस्त व संयम असलेली ही टीम तिच्यातील कष्टाची किमया सातत्य व कृतिशीलता बघून भारवलो आहे, नाणी अभ्यासावर बोलताना त्यांनी शिवराई बद्दल सविस्तर माहिती दिली, तर देवचंद महाले यांनी आपला शिवकार्य गडकोट मधील सहभाग मांडताना सह्याद्रीला होणारा उत्खणने, व लाकूडतोड,वनव्याचा कहर व त्या विरुद्ध केलेला संघर्ष मांडला, गडाचे संरक्षण संवर्धन येथील निसर्गाचे रक्षण हीच शिवशंभु राज्यांच्या चरणाजवळ जाण्याची जागा आहे असे त्यांनी सांगितले, तर मनोहर मोरे देशमुख यांनी माझ्या गड वाचवण्याच्या संघर्षात शिवकार्य गडकोटची नेहमी साथ लाभली आहे असे सांगितले, अखेरीस मान्यवरांच्या हातून टीम देहेरगड मोहिमेस त्यांच्या उपेक्षित असलेल्या देहेर गडाच्या संवर्धन कार्याबद्दल “गडमित्र पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला, तर त्यानंतर पश्चिम घाटातील भास्कर गड, दुर्ग भांडार, हरिहर गडाच्या सानिध्यात राहणारा, निसर्ग पर्यावरण वाचवणाऱ्या सोमनाथ भूर बुडे यास “गडमित्र पुरस्कार”देऊन गौरवण्यात आले, स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र, शाल, पुस्तकं भेट देऊन हा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,यासह संजय झारोळे,भुषण औटे,शिवाजीभाऊ धोंडगे,भारत पिंगळे,राज धनगर,मयुरेश बिडवई,बाळू बोडके,जयराम बदादे,रवी माळेकर,भाऊसाहेब चव्हाणके, सुयशा चव्हाणके, क्रांती चव्हाणके,संतोष सोनवणे,गडमित्र पुरस्कारार्थी सोमनाथ भूरबुडे, टीम देहेरगड,रमेश सोमवंशी,जितेंद्र साठे,सनी शेवाळे,दत्ता कांबळे,संतोष सोनवणे,निलेश यादव निवासराव देशमुख,श्रुती सोनवणे राहुलभाऊ मिंदे यासह दुर्गप्रेमी दुर्गसंवर्धक यावेळी उपस्थित होते,

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *