दिवाळीच्या सणासुदीच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत घट झाल्यामुळे खरेदीसाठी हा उत्तम काळ आहे. दिवाळीत विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि तुळशीच्या लग्नानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची खरेदी करतात. या पार्श्वभूमीवर, सोन्याचे दर घटले असल्यामुळे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १ ग्रॅमसाठी ७,२८४ रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १ ग्रॅमसाठी ७,९४६ रुपये आहे. याशिवाय, १८ कॅरेट सोन्याचा दर ५,९७२ रुपये इतका आहे.
मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर आणि नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये याच दरांवर सोने उपलब्ध आहे. याचप्रमाणे, चांदीच्या किंमतीतही मोठी घट झाली असून, आज एक किलो चांदीचा दर ९८,००० रुपये आहे, जो मागील काही दिवसांपेक्षा ४ हजार रुपयांनी कमी आहे.
दिवाळीनंतरच्या लग्नसराईत दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच सोनं आणि चांदी खरेदी करून या संधीचा फायदा घ्या.