महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील सोमवार, २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथून भव्य रॅली काढली जाणार आहे. रॅलीत डॉ. प्रदीप पवार, अतुल चांडक, अंकुश पवार, सलीम मामा शेख, सुदाम कोंबडे, योगेश शेवरे, सुजाता डेरे, सचिन सिन्हा, विशाल भावले, संदीप दोंदे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
दिनकर अण्णा पाटील हे मागील २५ वर्षांपासून नाशिकच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी काँग्रेस आणि भाजप अशा पक्षांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. मनसेमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगवृद्धी, बंद पडलेल्या कंपन्यांची पुनर्स्थापना, आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे त्यांच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये आहे.
दिनकर अण्णा यांनी राजसाहेब ठाकरे आणि मनसेचा विश्वास व्यक्त केल्याबद्दल आभार मानले आणि उमेदवारीवर ठाम असल्याचे सांगितले