google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

करंजकर व जाधव यांनी अर्ज मागे घेतल्याने गोडसे यांना मिळाला दिलासा.

author
0 minutes, 0 seconds Read

शेवटच्या क्षणी भाजपाच्या अनिल जाधव यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी करायला लावली धावाधाव!

हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले.

नाशिक वृत्त :- नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला बंडखोरी टाळण्यात यश आले सोमवारी शेवटच्या दिवशी शिवसेना,राष्ट्रवादी आणि भाजपच्या बंडखोरीने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले.

नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा दिल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजयी करंजकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच भाजप पक्षाचे अनिल जाधव यांना पक्षाने आपल्याला उमेदवारी देण्याचा आश्वासन दिले आहे असा दावा केला होता निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी हेमंत गोडसे यांनी जाधव यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली त्यामुळे जाधव यांनी माघारी घेतली आहे.करंजकर व जाधव यांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे यांना दिलासा मिळाला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *