google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

हेमंत गोडसे यांचे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन.

author
0 minutes, 0 seconds Read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल.

नाशिक वृत्त :- लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप राष्ट्रवादी महायुती तर्फे नाशिक मतदारसंघासाठी हेमंत गोडसे यांची भव्य फेरीद्वारे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी भव्य रॅलीत असंख जन समुदाय उपस्तीत

बी.डी. भालेकर मैदानापासून दुपारी एक वाजेच्या सुमारास या रॅलीला प्रारंभ झाला.अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपुष्टात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यापुर्वी मंगळवारचा मुहूर्त अनेक उमेदवारांनी साधला.

शिवसेना-भाजपने नाशिक, दिंडोरी मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज एकत्रितपणे दाखल करण्याचे ठरवले होते. त्यानुसार बी. डी. भालेकर मैदानावर दोन्ही पक्षांचे तसेच मित्र पक्षांचे, पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार राहुल आहेर, सरोज अहिरे, सुहास कांदे,दिलीप बनकर,नितीन पवार,माजी मंत्री बबन घोलप, राहुल ढिकले, शिवसेनेचे अजय बोरस्ते आदी नेते,सर्व शिवसेना,राष्ट्रवादी, मनसे,आर पी आय आठवले व कवाडे गट,रा स प, जय शिव संग्राम,रयत क्रांती सेना, लहुजी सेना महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी, उपस्थित होते.

नाशिक मतदारसंघातील उमेदवारी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या विषयावरील सर्व वाद्यांवर पडदा पडलेला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सहकारी पक्षांसह अन्य इच्छुक उमेदवार ही एक दिलाने उमेदवाराच्या प्रचारात काम करतील. सर्व घटक एकत्र आलेले दिसतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

नाशिक मतदारसंघातील उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

पक्षांचे झेंडे आणि कमळ व धनुष्य ही निशाणी अनेकांच्या हाती होती. प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला दोन्ही उमेदवारांनी पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *