google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

शोषित,पीडित व उपेक्षित घटकाला आधार देण्याचे कार्य केले, त्यांची विटंबना संभाजी ब्रिगेड कदापीही सहन करणार नाही

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक वृत्त :- संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने यवतमाळ येथे झालेल्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेवून सदर घटनेचा निषेद्ध नोंदवण्यात आला,
गणेशवाडी पंचवटी येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करून ज्या सावित्री ज्योतीने ज्ञानगंगा तुमच्या आमच्या घरा पर्यंत पोहोचविली व शोषित,पीडित व उपेक्षित घटकाला आधार देण्याचे कार्य केले त्यांची विटंबना संभाजी ब्रिगेड कदापीही सहन करणार नाही
त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील तमाम महापुरुषांचे चरित्र बदनाम करून व विटंबना करून काही विशिष्ट प्रवृत्ती जाणीवपूर्वक आमच्या अस्मितेला डीवचण्याचे काम सातत्याने करत आहे म्हणूनच संभाजी ब्रिगेडचा ठाम आरोप आहे की ज्यांना संविधान व लोकशाही संपुष्टात आणायची आहे.

अशी एकाच विचार सरणीची लोक हे कृत्य करत असतात म्हणूनच हे कृत्य करणाऱ्या हातापेक्षा या मागील मेंदूचा शोध घेणे सरकार पुढे आव्हान आहे,सादर निवेदन ईमेल द्वारे गृहमंत्री,महाराष्ट्रराज्य, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व पोलिस आयुक्त नाशिक यांना देऊन आरोपींवर कठोर कार्यवाही करणेबाबत निवेदन दिले आहे
या घटनेच्या निषेधार्थ उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हाप्रमुख शरद लबडे,महानगर प्रमुख प्रफुल वाघ,उपजिल्हा प्रमुख नितीन रोठे पाटील. विक्रम गायधनी,जिल्हा सरचिटणीस ,मंदार धिवरे,विशाल अहिरराव,राकेश जगताप,सागर पाटील,शंकर वाघमारे व विद्यार्थी उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *