google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

सकल मराठा समाजाची जिल्हास्थरीय समन्वय समिती स्थापनेचा निर्णय

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिकच्या शिवतीर्थवर झालेल्या बैठकीत विविध विषयावर ठराव.

नाशिक :- सकल मराठा समाजाच्या मूलभूत व्यवस्थापन व पुढील दिशा ठरवण्यासाठी दि.१९ एप्रिल रोजी नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाची बैठक झाली.सकल मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत बनकर यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत विविध विषयावर ठराव करण्यात आला.नारायणगड. जिल्हा बीड येथील ९०० एकरवरील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या बाबतीत नाशिकला मराठा संवाद बैठक नियोजनार्थ मराठा योद्धा जरांगे पाटील दौऱ्याच्या संदर्भात नियोजन बाबतीत तसेचं सकल मराठा समाजाच्या समन्वयासाठी मराठा समाजातील विविध क्षेत्रातील निवडक मंडळींची “सकल मराठा समाज समन्वय समिती नाशिक जिल्हा,”स्थापन करण्याचा महत्वपूर्ण ठराव करण्यात आला.या समितीत मराठा समाजाचे ओबीसीतून ५० टक्केच्या आत आरक्षण लढा, व सगेसोयरे अधिसूचना जारी करणे बाबतीत धोरणात्मक निर्णय, नियोजनासाठी, समाजाच्या मूलभूत कार्यासाठी ही मध्यवर्ती समिती म्हणून कार्यरत राहील असा एकमुखी ठाव यावेळी घेण्यात आला.
दरम्यान यावेळी विविध ठरावं करण्यात आले. मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नाशिक दौऱ्याबाबत परस्पर निरोप न-देता यापुढे सकल मराठा समाज नाशिक जिल्हा समन्वय समितीला याबाबतीत थेट सूचित करण्यात यावे,किंवा कळवावे याबाबतीत अंतरवेली सराटी येथे जाऊन पत्र देण्यात येईल.असा ठरावं सर्वांनूमते घेण्यात आला,तसेच नाशिकचे शिवतीर्थ याच ठिकाणी १०५ दिवसाचे सकल मराठा समाजाचे मध्यवर्ती आंदोलन झाले, या आंदोलनाचे नेतृत्व नाना बच्छाव यांनी केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हेच ठिकाण नाशिक जिल्ह्याचे मराठा आंदोलन व कार्याची दिशा ठरण्यासाठी असेल. त्यानुसार यापुढे जिल्हा भरातील मराठा समाजातील सर्वांना माहिती व सूचित करण्यात येईल. सकल मराठा समाज कुठल्याही राजकीय पक्ष व व्यक्तीस पाठिंबा दिलेला नाही,व शेवटी सकल मराठा समाज समन्वय समिती स्थापनेसाठी मराठा संघटना व्यक्तींना सोबत घेऊन हि समिती गठीत करण्याचा ठराव यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.ती समिती गठीत करताना मराठा समाजातील विविध घटकाना समावून घेतले जाईल, त्याबाबतीत नियमावली ही जाहीर केली जाईल,असा ठराव संमत करण्यात आला,बैठकीच्या अखेरीस बीड जिल्ह्यातील नारायणगड. येथील ९०० एकरवरील मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या विक्रमी सभेसाठी नाशिक जिल्ह्यातील असंख्य मराठा जातील त्याबाबतीत सकल मराठा समाज कार्यरत राहील असेही मराठा उपोषणकर्ते नाना बच्छा व यांनी सांगितले,
यावेळी सकल मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत बनकर,उपोषण कर्ते नाना बच्छाव,राम खुर्दळ,श्रीराम निकम,शरद अण्णा लभडे,सुधाकर चांदवडे,योगेश नाटकर पाटील,विलास गडाख,संजय पांगारे,संदिप हांडगे, ज्ञानेश्वर सुरासे,अनिल आहेर, सागर बागुल,सुभाष भोसले,सागर वाबळे,विकी गायधनी,गौरव गाजरे,यासह मराठा बांधव यावेळी उपस्थित होते,

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *