google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

संभाजी ब्रिगेड सातपूर विभागच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा

author
0 minutes, 0 seconds Read

आपला महाराष्ट्र वृत्त :-

सातपूर नाशिक :- संभाजी ब्रिगेड सातपूर विभागच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यावेळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अष्टपैलू असलेले बाबासाहेब यावेळी उपस्थितांसमोर सांगण्यात आले त्याचबरोबर बाबासाहेबांचे सर्वांनी व्यक्तिमत्व व बाबासाहेबांची प्रबोधन चळवळ ही तळागाळापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची असून सातत्याने लोकांपर्यंत आपली भूमिका ठामपणे मांडून सत्य बाबासाहेब आपण अंगीकारून बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञा व विचार बाबासाहेबांनी केलेले लिखाण या सर्वाथाने हा उत्सव जर साजरा करायचा असेल तर नाचून नव्हे बाबासाहेबांची प्रबोधन चळवळ वाचून व सत्य चरित्र लोकांपर्यंत सार्वभौम अष्टपैलू बाबासाहेब पोहोचवणे आपली जबाबदारी आहे हे काम संभाजी ब्रिगेड च्या वतीने गेली 30 दशके सातत्याने लोक लोकांमध्ये जाऊन प्रबोधन चळवळ प्रबळ करण्याच्या हेतूने महामानवांच्या जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्वत्र महाराष्ट्रामध्ये साजरे करण्यात येतात याचे प्रमुख कारण म्हणजे श्रमकरी शेतकरी कष्टकरी शोषितांची भूमिका घेऊन लोकांपर्यंत जाण्याकरिता महामानवांची जयंती व इतरही महापुरुषांच्या जयंती त्याचबरोबर त्यांचे स्मृतिदिन देखील वैचारिक पद्धतीने साजरे व्हावे
या कार्यक्रमाचे नियोजन संभाजी ब्रिगेडचे प्रसिद्धीप्रमुख मंदारजी धिवरे, सनी मरसाळे, छगन हजारे, प्रतीक पगार,वीर काळे यांनी केले याकार्यक्रमाप्रसगी प्रमूख उपस्थित संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद अण्णा लबडे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ सरचिटणीस विकी गायधनी सागर पाटील नितीन काळे अनिल आहेर गोपाल पाटील हर्षल जाधव संघर्ष हजारे मयूर मरसाळे प्रशांत धनगोटे सातपूर विभागातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *