google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

उपेक्षित क्रांतीबा जयंतीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा

author
0 minutes, 1 second Read

मती,नीती,गती,वित्त विद्येच टोकाचं महत्व जोतिरावांनी तुम्हाला आम्हाला सांगीतल.कुलवाडीभूषण छत्रपती शिवराय व थॉमस पेन यांची प्रेरणा घेऊन आयुष्यभर सत्यशोधक आयुष्य जगणारा व तुम्हाला आम्हला गुलामगिरीच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढणारा क्रांतीबा.
शिक्षणाचा विशाल ज्ञानसागर मती,नीती,गती,वित्त विद्येच अति उच्च महत्व सांगून आमच्या पर्यंत पोहचवला म्हणून आपल्याला पित्त झाल नाही.आणि चित्त जागेवर राहील.पण या भारताच दुर्दैवच आम्ही ( भारतरत्न ) जोतीराव फुलेंना उपेक्षित ठेवलं .
चिपळूणकर शास्त्री निबंधमालेत जोतिरावांच्या एका अक्षराची व्याकरनातील चुकी काढतो जो चिपळूणकर जोतीरावांच्या अंग खांद्यावर खेळला तोच उलट्या पायघड्या करतो.अश्या विकृत चिपळूणकरांना लहुजी वस्ताद आणी क्रांतीबा फुलेंना समोर ठेऊन बुद्धीच्या कसोटीवर आखाड्यात शड्डू ठोकून बोलवलच पाहिजे.ही प्रमुख जबाबदारी लेखकांची,संशोधकांची, अभ्यासकांची,मराठी व्याकरण कारांची आहे. ती तुम्ही सक्षम पणे पेलाल ही अपेक्षा
शुद्ध मराठी कोणती तर तुम्ही जिथे कुठे महाराष्ट्रात राहता तुम्हांला जी मराठी येते ती मराठी शुद्ध मराठी ही आमची प्रामाणिक आणि ठोस भूमिका आहे.
जातीयवादी धर्मवादी वर्णवर्चस्ववादि मानसिकतेला छेद देऊन आम्ही प्रत्येक भारतीयांनी क्रांतीबा फुलेना सपत्नीक भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.हे प्रयत्न फक्त बोटावर मोजण्या इतके लोक करतात.आता जातीत बंदिस्त केलेले जोतीराव काही तथाकथित लोकांची PVT LTD प्रॉपर्टी झालीय.(आम्ही ती होऊ देणार नाही हा भाग वेगळा)परिवर्तनवादी चळवळीत काही विकृती सामील होऊन चळवळ बदनाम करण्याचे प्रकार आहेत.ते कोरोना विषाणू सारखे सूष्म असतात.चळवळ पोखरून टाकतात.कारण त्यांच्या मेंदूला चिटकलेली असते जात किंवा (वैदिक)धर्म नावाची दरिद्री.
फुले दाम्पत्याच बळच नाव घेणाऱ्यांना social media वर जयंतीची आठवण कदाचित होते.यांना उदा:भुजबळ साहेबांचा वाढदिवस विचारा पटकन सांगतील 15 ऑक्टोबर, त्यांना जोतिरावाची जयंती कशी माहीत असणार(मी कोणाचाही विरोधक नाही उलट मी माझाच विरोधक आहे.कारण आजूबाजूच्या धर्म आणि जातीने सडलेल्या मेंदूच्या सानिध्यात वेळ काढावा लागतो.मोठ्या नेत्याच नाव घेऊन TRP मिळवण्याचा धंदा नाही.)

 • प्राच्यविद्यापंडित कॉ.शरद पाटील म्हणतात स्व जातिकडे तिरकस पणे पाहता येणे म्हणजे जातीअंताची सुरुवात समजावी.
  क्रांतीबा म्हणजे सामाजिक,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,धार्मिक क्रांती घडवणारा क्रांतिकारक समाज परिवर्तनाचा केंद्र बिंदू जोतीराव.
  त्यांच्यासाठी लढणार सोडा फडफडनार कोणी दिसत नाही.फक्त सोईनुसार वापर होतो आम्ही छाती काढून म्हणतो खरं फुले,शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र प्रत्येकान स्वतःच्या मनाचा ठाव घ्यावा.इथली वैदिक धर्मव्यवस्था किती बळकट आहे.आज गरज आहे ती माझ्या जोतीरावांच्या आसुडाची जो माझ्या शेतकरी श्रमकरी कष्टकरी बांधवाच्या साथीनं या व्यवस्थेवर उगारता येईल.आणि खितपत पडलेल्या मेंदूची साक्ष स्वताला घेता येईल.
  जोतीराव आजही उपेक्षित आहेत गुलामगिरीच्या जोखडातून आमची मुक्तता क्रांतिबान केली पण आम्ही पुन्हा अटकलो जाड साखळदंडाणी आमचा मेंदू कचकाटूनन बांधला आम्ही जाती धर्मा पलीकडे वाकून बघायला तयार नाही.कारण मेंदू आपल्या ताब्यात नाही आपल्या धडावर आपलं मस्तक असावं जर हे आपण करू शकलो तरी जोतिरावांना खरी आदरांजली असेल.आणि महत्वाच प्रत्येक जातीतील,धर्मातील,प्रांतातील पंथातील,भाषेतील प्रत्येकावर जोती साऊ चे अनंत उपकार आहेत.जे आमच्या कडून कधीही फिटनार नाहीत.आम्ही किमान जोतीराव आमचा किंबहुना आम्ही जोतीरावांच्या विचारांचे पाईक आहोत हे प्रत्येकाने स्वतःला सांगावं तुम्हाला सर्वाना उपेक्षित क्रांतीबा फुले जयंतीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि या तुटपुंज्या लिखाणाला पूर्ण विराम देतो
  • . प्रफुल्ल रेखा एकनाथ वाघ
   संभाजी ब्रिगेड,महानगर प्रमुख
   नाशिक

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *