google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

जंपरोप राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला 32 पदके ..

author
0 minutes, 7 seconds Read

आपला महाराष्ट्र वृत्त :– 31 मार्च 24 ते 02 एप्रिल 2024 दरम्यान मध्य प्रदेश चंद्रवतीगंज येथे जंपरोप फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित 20 व्या वरीष्ठगट राष्ट्रीय जंपरोप अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत अनेक पदके जिंकत महाराष्ट्राचे नावलौकिक केले आहे.आपल्या महाराष्ट्रा संघात 28 खेळाडूंचा सहभाग होता त्यात जंपरोप खेळत असलेल्या विविध क्रिडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांची लूट केली या खेळाडूंना संघ प्रशिक्षक म्हणून अमन वर्मा, विदेश मोरे, संघ व्यवस्थापक म्हणुन उमेश कंधारकर, तन्मय कर्णिक, विवेक पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले. जंपरोप खेळला आशियायी ऑलिंपिक संघटनेची मान्यता मिळाल्या पासून खेळाडू व प्रशिक्षक यांच्यात चैतन्यपूर्ण उत्साहाचे वातावरण आहे या जंपरोप खेळात खेळाडूंना अधिकाधिक प्रगती करण्याची संधी असल्याने यामुळे खेळाडू अतिशय मेहनतीने सराव करून खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.पदक विजेत्यांना नाशिक पूर्वचे आमदार अँड. राहुल ढिकले, महाराष्ट्र जंपरोप चे अध्यक्ष (जळगाव) मा. महापौर – विष्णू भाऊ भंगाळे,संघटनेचे मार्गदर्शक शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. अशोक दुधारे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. आनंद खरे, जंपरोप संघटनेचे सचिव दीपक निकमपाटील, खजिनदार प्रशांत पारगावकर, ज्योती निकम, मनीषा काठे, राजीव वाकडे आदींनी शुभेच्छा दिल्या .पदक प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणेविराज काळे :- 1 गोल्डयश गोरे :- 1 गोल्ड, 1 सिल्वरकृष्णा तरासे :- 1 ब्राँझ 1 सिल्वर चैतन्यक्षीरसागर :- 1 गोल्डसमर्थ राऊत :- 1 गोल्ड, 1 सिल्वरशुभम तरासे :- 1 गोल्डगौरव शिंदे :- 1 ब्राँझअभिजीत पालवे :- 1 ब्राँझआदित्य प्रजापती :- 1 ब्राँझपार्थ अलंकार :- 1 ब्राँझतनवी नेमाडे :–2 गोल्डअदिती फडलीस :- 1 ब्राँझ, 1 गोल्डयोगिता सामंत :- 1 ब्राँझ, 1 गोल्डपदमाक्षी मोकाशी :- 1 गोल्ड,श्रेया वाणी :- 1 गोल्ड, 1 सिल्वरअंकिता महाजन :- 1 गोल्डभार्गवी पाटील :- 1 गोल्डरोशनी :- 2 गोल्डराजुर लुंकड :- 2 गोल्डईशान पुथराण :- 2 सिल्वररोनक पालवे :- 1 गोल्डनमन गंगवार :- 1 सिल्वर

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *