google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीतर्फे नाशिक शहरात एकदिवसीय सामूहिक उपवास

author
0 minutes, 0 seconds Read

आपला महाराष्ट्र वृत्त

नाशिक :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. याविरोधात आम आदमी पार्टीने आक्रमक पवित्रा घेत टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले होती. त्यावेळी कार्यकर्त्यांना अटक झाली होती. ईडीची प्रतिकात्मक होळी पेटवून निषेध नोंदवण्यात आला होता. तसेच केजरीवालांच्या समर्थनार्थ पक्षाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.याचाच पुढचा भाग म्हणून आम आदमी पार्टीने देशभरात एक दिवसीय सामूहिक उपोषण करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला.केजरीवालांच्या अटकेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. आप ने आज देशभरात सामूहिक उपोषणाचे आयोजन करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला. ईडीकडून कोणतेही सबळ पुरावे न दिल्याने आप खा. संजय सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या नेत्यांना देखील केवळ राजकीय सुद्बुद्धीने अटक केली असून गुन्हा सिद्ध करताना ईडी तोंडावर पडणार असल्याचे आप चे नेते योगेश कापसे यांनी सांगितले.

आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करून ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाई विरोधात रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक समोर 11 ते 5 या वेळेत सामूहिक उपवास करण्यात आला. अशाच प्रकारचा उपवास देशातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात आला. यातून भगवान गौतम बुद्ध ,भगवान महावीर व महात्मा गांधी यांच्या शिकवणीनुसार स्वतःच्या शरीराला यातना देऊन हुकूमशहा नरेंद्र मोदीच्या मतात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. “रघुपति राघव राजाराम, पतित पावन सिताराम” हे महात्मा गांधींना आवडणारे भजन गाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाईट कृत्याचा निषेध करण्यात आला. ज्याप्रकारे देवकीच्या आठवा पुत्र श्रीकृष्ण यांनी कंसाचा वध केला होता त्याचप्रमाणे अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींचा राजकीय खात्मा करेल,अशी भावना या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटके चे उत्तर मतदार राजा येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाद्वारे देईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.आगामी काळात इंडिया आघाडी नरेंद्र मोदी व भाजपा यांचे अन्यायकारक सरकार या देशातून उखडून फेकतील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

याप्रसंगी पूर्व विधानसभा अध्यक्ष योगेश कापसे, ॲड. बंडूनाना डांगे, प्रदेश युवा उपाध्यक्ष स्वप्निल घिया, राज्यप्रवक्ता ॲड.अभिजीत गोसावी, युवा संघटनमंत्री प्रदीप लोखंडे, अमर गांगुर्डे, विकास पाटील, माजिद पठाण, प्रदीप लोखंडे, निर्मला दाणी, योगेश चिंचले , शांताबाई बनकर, फैजान शेख, नूतन कोरडे, ॲड. प्रभाकर वायचळे, अनिल कौशिक, अल्ताफ शेख, आदी हजर होते. सदर आंदोलन राज्याचे संघटन सचिव नविंदरसिंह अहलूवालिया यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *