google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची सुरक्षित नाशिक साठी नाविण्यपुर्ण संकल्पना “ग्राउंड प्रेझेन्ट सिस्टीम सुरक्षित नाशिक” या ॲपचे अनावरण.

author
0 minutes, 4 seconds Read

आपला महाराष्ट्र वृत्त
नाशिक :- मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्या पासुन नागरीकांची सुरक्षितता, महिलांची सुरक्षितता यास प्राधान्य देवुन शहरातील नागरीकांच्या समस्या निराकारणार्थ अभ्यास करून

१) सी.पी. व्हॉट्ॲप क्रमांक,

२) नाशिक पोलीस ट्विटर

३) इंस्ट्राग्राम, फेसबुक

४) नियंत्रण कक्ष येथे प्राप्त होणा-या नागरीकांच्या समस्या समजावुन घेवुन त्यांचे समस्यांचे तात्काळ निराकरण करण्या करीता उपाययोजना केल्या आहेत. तसेच नागरीकांशी सुसंवाद साधुन त्यांच्या समस्या व सुचना जाणुन घेण्याकरीता ‘मॉर्निंग वॉक विथ पोलीस ‘ हा उपक्रम शहरातील विविध जॉगिंग ट्रॅक येथे भेट देवुन राबविण्यात येत आहे.

त्याच प्रमाणे नाशिक शहरातील नागरीकांना सुरक्षितता प्रदान करण्याकरीता गुन्हेगारांविरुध्द प्रतिबंधक मोहिम राबविण्याचे उद्देशाने शहरातील निर्जन ठिकाणे, गार्डन, मोकळी मैदाने, शाळा, कॉलेज, बांधकामांची ठिकाणे या ठिकाणी वावरणारे टवाळखोरी करणारे इसमांविरूध्द वेळोवेळी विशेष मोहिम राबवुन कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील गुन्हेगारीचा अभ्यास करून गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देवुन त्यांना समाज प्रवाहात आनण्याकरीता ‘विधी संघर्षित बालकांचे समुपदेशन व गुन्हेगार दत्तक योजना’ यासारखे समाजाच्या निकोपतेसाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील नागरीकांना वरिल उपक्रमा व्यतिरिक्त प्रभावी तत्पर सेवा देण्या करीता नाशिक शहरातील पेट्रोलिंग व व्हिजीबल पोलीसींगचा अभ्यास करून श्रीमती नवरेशम कौर ग्रेवाल व त्यांची टिम यांचे तांत्रिक मदतीने “ग्राउंड प्रेझेन्ट सिस्टीम सुरक्षित नाशिक” ॲपची निर्मीती करून त्याव्दारे व्हिजीबल पोलीसींग व प्रभावी पेट्रोलिंग राबविण्याचे निश्चीत केले.

त्यानुसार मा. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय हद्दीत नागरीकांचे सुरक्षिततेचे दृष्टीने “ग्राउंड प्रेझेन्ट सिस्टीम सुरक्षित नाशिक” ॲपचा अनावरण समारंभ दिनांक ०२/०४/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. बॅरेक क. १७, भिष्मराज बाम हॉल, पोलीस मुख्यालय, नाशिक शहर येथे आयोजन करण्यात आला.

सदर कार्यक्रमामध्ये “ग्राउंड प्रेझेन्ट सिस्टीम मा.श्री. जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक व मा.श्री. मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे हस्ते सुरक्षित नाशिक” ॲपचे अनावरण प्रमुख अतिथी बी.बी. चांडक, उपाध्यक्ष लोकमत समुह यांचे तसेच करण्यात आले.

“ग्राउंड प्रेझेन्ट सिस्टीम सुरक्षित नाशिक” ॲप तयार करण्यासाठी तांत्रिक मदत पुरविणा-या श्रीमती नवरेशम कौर ग्रेवाल व त्यांची टिम यांनी नमुद ॲप बद्दल सविस्तर माहिती दिली की, “ग्राउंड प्रेझेन्ट सिस्टीम सुरक्षित नाशिक” या ॲपमध्ये पोलीस स्टेशन निहाय विविध प्रकारचे स्पॉट त्यामध्ये १) सर्व साधारण ठिकाणे त्याअंतर्गत विविध ३७ उपठिकाणे, २) प्राधान्यक्रम देण्यात येणारे ठिकाणे, ३) निवडणुक संबंधी ठिकाणे, ४) नागरीकांकडुन सुचित करण्यात आलेले ठिकाणे, अशा ठिकाणांचा समावेश सदर ॲप माध्यमातुन करण्यात आला आहे. विशिष्ठ ठिकाणांवर विशिष्ठ वेळेत पोलीसांची उपस्थिती राहुन नागरीकांना सुरक्षितता मिळावी याकरीता वर नमुद ठिकाणी भेट व गस्ती करीता निश्चीत करण्यात आलेली आहे.

सर्व साधारण ठिकाणांमध्ये गार्डन्स, मोकळी मैदाने, जॉगिंग ट्रॅक्स, मार्केटची ठिकाणे, भाजीपाल्याची ठिकाणे, बसस्थानके, रेल्वेस्टेशन, सराफाची दुकाने, बँका, महिलांचा वावर असलेली ठिकाणे अशा विविध ३७ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच शाळा, कॉलेजेस, मर्मस्थळे, महत्वाची धार्मिक स्थळे, महत्वाची शासकिय कार्यालये यांचा प्राधान्यक्रम असणा-या ठिकाणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. ठिकाणांनुसार गोल सर्कल, स्टार, इमारतीचे चिन्हे व समुहाचे चिन्ह अशा विविध चिन्हांचा ॲपमध्ये वापर करण्यात आलेला आहे. सदरचे चिन्हे भेट देण्यापुर्वी ग्रे रंगाची असुन सदर ठिकाणी पेट्रोलिंग अंमलदारांनी भेट दिल्यानंतर ग्रिन होणार आहेत. पुर्वीच्या टेक्नीकल क्यु.आर. कोड या पेट्रोलिंग पध्दतीपेक्षा सदरची पध्दत अत्यंत प्रभावी व परिपुर्ण आहे. कारण ही सिस्टीम अक्षांश-रेखांश या गुगल प्रणालीवर आधारीत असुन सदर ठिकाणी अंमलदारांनी फोटो काढुन अपलोड केल्यानंतर त्यामध्ये आजुबाजूचा परिसर देखील दिसणार आहे. त्यामुळे प्रत्येक निश्चीत केलेल्या ठिकाणांना पोलीस अंमलदारांना भेट देणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय ज्या ठिकाणी ज्यावेळी भेट देणे गरजेचे आहे. उदा. शाळा सुटण्याचे व भरण्याच्या वेळा, जॉगिंग ट्रॅक, गार्डन या ठिकाणी नागरीकांच्या वावर असणा-या वेळा, मार्केट, भाजीपाल्याची ठिकाणे या ठिकाणी महिलांच्या वावर असण्याच्या वेळा इत्यादी ठिकाणी त्यात्यावेळी भेट देणे बंधनकारक असुन त्यावेळा देखील भेट दिल्यानंतर सदर ॲपमध्ये दिसुन येणार आहेत.

अशा प्रकारे सदरचे ॲप व्हिजीबल पोलीसींग साठी, पेट्रोलिंग साठी व नाशिकच्या सुरक्षिततेसाठी ‘सुरक्षित नाशिक’ या मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेला परिपुर्ण न्याय देणारे असुन त्यामुळे नागरीकांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी व पोलीस दलाची प्रतिमा उंचवण्यासाठी सहाय्यभुत होणार आहे.

सदर ॲपमध्ये नागरीकांच्या सुचना विचारात घेवुन वेळोवेळी सुधारणा देखील करण्यात येणार आहेत.

“ग्राउंड प्रेझेन्ट सिस्टीम सुरक्षित नाशिक” ॲपचे अनावरण प्रसंगी प्रमुख अतिथी मा. श्री. जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक व मा.श्री. बी.बी. चांडक, उपाध्यक्ष लोकमत समुह यांनी आपले मनोगत व्यक्त करून मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सुरू केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल गौरवोद्द‌गार काढले. तसेच मा. जिल्हाधिकारी साो. यांनी, मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक सर यांनी सुरक्षित नाशिक साठी त्यांनी पदभार घेतल्यापासुन केलेल्या उपाययोजनांचे कौतुक करून अशा प्रकारचे ॲप त्यांचे कार्यालयात देखील कार्यान्वित करता येवु शकते असे सुचक विधान केले.

सदर कार्यक्रमा करीता मा. श्री. जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक, मा.श्री. बी.बी. चांडक, उपाध्यक्ष लोकमत समुह, मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर श्रीमती, नवरेशम कौर ग्रेवाल, ॲप डेव्हलपर यांनी मार्गदर्शन करून मा.श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मा. श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, मा. श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उपआयुक्त, मुख्यालय नाशिक शहर तसेच सर्व सहा. पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी व २०० पोलीस अंमलदार उपस्थित होते.

समारोप कार्यक्रमाचे डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांनी आभार प्रदर्शन करून सुत्रसंचालन सहा. पो. निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *