google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

“गाव तिथे साखळी उपोषण”काटेकोर अंमलबजावणी करा.

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिकच्या सकल मराठा समाजाचे आवाहन.

नाशिक :- मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात येत्या १ डिसेंम्बरपासून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मराठा आरक्षनाच्या लढ्यात “गाव तिथे मराठा आरक्षण” यासंदर्भात नाशिकच्या सकल मराठा समाजवतीने शिवतीर्थावर नाशिक जिल्ह्यातील गावागावात जाऊन मराठा साखळी उपोषणाबाबत व्यापक जनजागृती करण्याबाबत भूमिका ठरवण्यात आली.गावागावात मराठा साखळी उपोषणाबद्दल
मराठा आरक्षणाच्या दृष्टीने शांततामय आंदोलने करण्यात यावी,गावागावात साखळी उपोषण करतांना एक पत्र बनवून पोलीस स्टेशन,तहसीलदार, ग्रामपंचायत ला पत्र द्यावे,सोबत मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱया सर्व जाती समुदायाला सोबत घ्यावे,गावातील कुटुंबे,मंडळे,महिला,विद्यार्थी, व्यापारी यांना सोबत घेऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत येत्या २४ डिसेंम्बर पर्यंत हे गाव पातळीवर अखंडित मराठा साखळी उपोषण करावे असे आवाहन नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषण संयोजन मंडळाने केले आहे.

नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या ७९ दिवसापासून मराठा साखळी उपोषण अखंडित सुरू आहे,मराठा योद्धा नाना बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली या उपोषण स्थळी अन्नत्याग आंदोलन झाले.दिनांक ३० नोव्हेम्बर रोजी सायंकाळी सकल मराठा समाजवतीने कोअर कमिटीची बैठक झाली,यावेळी मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील सभा जागृती व राज्य सरकारला येत्या २४ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला दिलेल्या आल्टीमेंटम आधी १ डिसेंम्बरपासून राज्यातील सर्व गावागावात साखळी उपोषण यशस्वीतेसाठी लोकजागृतीसाठी सकल मराठा समाजावतीने भेटी दिल्या जाणार आहे,तसेच प्रवक्ते राम खुर्दळ,शिवव्याख्याते नितीन डांगे पाटील यांचे मार्गदर्शन दौरे ही अखंडित होतील.नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावात मराठा आरक्षणासाठी सर्वाभिमुख साखळी उपोषण सुरू करण्यासाठी सातत्याने नाशिकच्या शिवतीर्थावर मार्गदर्शन केले जाणार आहे.जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गाव खेड्यातील शहरातील प्रत्येक मराठा बांधव व सर्व जाती समुदायांना सोबत घेऊन शांततेने साखळी उपोषणे करा,या उपोषणात वारकरी,भजनी मंडळ,युवक मंडळे,महिला वर्ग,कुटुंबे,विद्यार्थी वर्ग,व्यावसायिक याना सोबत घ्या,तत्पूर्वी एक आंदोलन परवानगी पत्र स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र द्यावे,त्यावर प्रमुखाची सही शिक्का घ्यावा,हे।पत्र माहितीसाठी तहसीलदार, ग्रामपंचायतला द्यावे असे यावेळी आवाहन करण्यात आले.


नाशिकच्या सकल मराठा समाजावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवशंभूराजे,छत्रपती शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील यांचे प्रतिमापूजन यावेळी झाले,
यावेळी मराठा आंदोलक विकी देशमुख,व शिवव्याख्याते नितीन डांगे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्ताने “मराठा आरक्षणाची शपथ”,घेण्यात आली.

यावेळी नाना बच्छाव,चंद्रकांत बनकर,प्रवक्ते राम खुर्दळ,नितीन रोटे पाटील,प्रचारक नितीन डांगे पाटील,ऍड कैलास खांडबहाले,डॉ वसंत ढिकले,निलेश ठुबे,सागर वाबळे,ज्ञानेश्वर सुरासे,विक्रम गायधनी,अण्णा पिंपळे,हिरामण अण्णा वाघ,सुभाष शेळके,सचिन निमसे,प्रकाश धोंडगे,योगेश नाटकर,कृष्णा महाराज धोंडगे,प्रफुल्ल वाघ,योगेश कापसे,जगदीश जाधव,गौरव गाजरे,सचिन देवरे,डॉ अजित तिदमे,डॉ विठ्ठल गाजरे,अनिल आहेर,सुधाकर चांदवडे,विनोद नाठे,श्रीराम निकम,अरुण पळसकर,शरद लभडे,संदीप खुटे पाटील,ज्ञानेश्वर शिंदे,तानाजी गायकर,योगेश नाटकर,विक्रांत देशमुख,राम गहिरे,ममता पाटील,मंगलाताई शिंदे,रोहिणी उखाडे,एकताताई खैरे,स्वातीताई कदम,रोहिणी दळवी यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते,

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *