google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची वर्णी

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली असताना, तिकडे छगन भुजबळ हेच महायुतीचे उमेदवार असतील हे समोर आलं आहे. नाशिक लोकसभेबाबात महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरु होती. मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झालं असून, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु होती. मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं चित्र आहे.

महायुतीतील दोन महत्वाच्या जागांचा तिढा होता तो सुटला आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची वर्णी लागली. तर साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भाजपच्याच तिकिटावर लढणार आहेत. साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात उदयनराजेंची राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे. उरलेल्या दोन वर्षांसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *