google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

आधी शेतकरी हित नंतर आमदार, पक्ष बाळासाहेब थोरात..

author
0 minutes, 0 seconds Read

देशाच्या कॅलिफोर्निया असलेल्या निफाड तालुक्यात अवकाळी पावसाने गारपिटीस वादळ वाऱ्याने भुईसपाट करत निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक म्हणा की कांदा, भाजीपाला, ऊस, टोमॅटो ,अशी सर्व पिके उध्वस्त झाल्याने या पिडीत बळीराजाला म्हणा शेतकऱ्याला मायेचा आधार देण्यासाठी विधानसभा सभागृहातील काँग्रेस विधिमंडळ नेते तथा राज्याचे माजी महसूल व कृषि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे, मौजे सुकेणे व कोठुरे फाट्यावरील द्राक्ष उत्पादकांचे देशाचे नेतृत्व करणारे द्राक्ष निर्यातदार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष तथा द्राक्षतज्ञ म्हणून देशभरात ओळख असणारे पिडीत द्राक्ष उत्पादक शेतकरी जगन्नाथ दादा खापरे यांच्या बांधावर जाऊन नतंर त्यांच्या घरी जाऊन त्यांना धीर व आधार देण्याचा प्रयत्न केला जगन्नाथ खापरे यांची पुर्णपणे निर्यातक्षम पंचवीस एकर द्राक्ष बाग या अस्मानी स़कंटात मातीमोल झाल्याने जवळपास एक ते दिड कोटींचे नुकसान खापरे यांचे झाले.

तर या संकटातून द्राक्ष उत्पादकाना सावरण्यासाठी सन्माननीय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन दौरा केला यात महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश सचिव प्रकाशराव अडसरे, काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मविप्र विद्यमान सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे ,काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस रमेश कहाडोळ, ज्ञानेश्वर गायकवाड ,नाशिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, नाशिक काँग्रेस शहराध्यक्ष शरदराव आहेर, कोपरगाव येथील संजीवनी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नितीन कोल्हे, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिंगबर गिते, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मोगल, निफाड काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मलाताई खर्डे, शामराव शिंदे, माधवराव निश्चित ,नरेंद्र गीते, आदीसह निफाड तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *