google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

गंगापुर गांव जकात नाका याठिकाणी रस्त्याने येणारे जाणारे वाहनांच्या काचा फोडुन दहशत निर्माण करणारे आरोपी गजाआड गंगापुर पोलीस स्टेशन यांची विशेष कामगिरी

author
0 minutes, 4 seconds Read

नाशिक वृत्त:- गंगापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दार जय चंद्रकांत गजभिये याने दिनांक १३/०२/२०२४ रोजी रात्री १०.३५ वाजेचे सुमारास हुन्दाई कार क्रमांक एमएच-१५-एचक्यु-०७१० गाडीतून त्याचे मित्र कुशल अरुण भगत व ओमकार वाळुंज  गाडीतून गिरणारे रोडने नाशिककडे येत असतांना गंगापुर गांव जकात नाक्याजवळ त्यांच्या गाडीच्या समोर अनोळखी इसमांनी आडवे होवुन गाडी अडवुन त्यांचेशी हुज्जत घालुन गाडीची पाठीमागील बाजुच्या काचेवर दगड मारुन काच फोडुन नुकसान केले त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारला असता नमुद इसमापैकी एकाने त्याचेकडील चाकुन प्राणघातक हमला करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला  फिर्यादी यांनी सदरचा वार चुकवुन त्याठिकाणाहुन निघुन येत पोलीस ठाणे येथे आले. त्याचवेळी इसम नामे मयुर रघुनाथ मोरे रा. मुपो. खंबाळे (त्रंबकरोड येथे मळयात) ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक यांची टाटा व्हिस्टा कार क. एमएच-१५-डीएम-८२३२ व श्री. विजय नथु रसाळ रा. फलॅट नं.६, आकार रेसीडेन्सी, ध्रुवनगर, गंगापुर शिवार, नाशिक यांचा टेम्पो क. एमएच-१६-एई-४८५२ यांचे देखील नमुद इसमांनी दगड मारुन काच फोडलेबाबत त्यांनी माहिती दिल्याने फिर्यादी जय गजभिये यांची तक्रार नोंदवुन घेवुन नमुद घटनास्थळी गुन्हेशोध पथकाने लागलीच भेट देवुन नमुद अज्ञात इसमांची नावे निष्पन्न केली. त्याबाबत गंगापुर पोलीस स्टेशन गुरनं। ३४/२०२४ भादविक.३०७, ३०८,३४१, ३३६, १४३,१४८,१४९, ४२७, ५०४, ५०६, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला

त्याअनुषंगाने गंगापुर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोउनि. श्री. मोतीलाल पाटील व पथकाने गुप्तबातमीदारामार्फत माहिती घेवुन त्या आधारे नमुद आरोपीतांचा शोध घेतला असता ते कोकणगांव ता. दिंडोरी येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन गंगापुर पोलीस स्टेशनचे पोउनि. श्री. मोतीलाल पाटील, पोहवा/गिरीश महाले, पोहवा / रवि मोहिते, पोअं/मच्छिंद्र वाकचौरे, पोअं/सोनु खाडे, पोअं/गोरख साळुंके व पोअं/थविल असे रवाना होवुन त्याचा कोकणगांव भागात शोध घेतला असता १) अनिकेत उर्फ अंडया पप्पु शार्दुल वय-१९ वर्षे रा.राजीवनगर, गोवर्धन गांव, नाशिक २) प्रतिक विष्णु जाधव वय-१९ वर्षे रा. मोतीवाला कॉलेजसमोर, दत्तमंदीर, शिवाजीनगर, नाशिक ३) विजय दादु खोटरे वय-१९ वर्षे रा. विठठल रुक्मिणी मंदीरासमोर, भवर टॉवर, शिवाजीनगर, नाशिक ४) कपिल उर्फ चिंटु बाळु गांगुर्डे वय २१ वर्षे रा. मोठा राजवाडा, गंगापुर गांव, नाशिक ५) रोहित उत्तम वाडगे वय-१९ वर्षे रा. चावडीजवळ, मोठा राजवाडा, गंगापुर गांव, नाशिक हे मिळुन आल्याने त्यांना गंगापुर पोलीस स्टेशन गुरनं.। ३४/२०२४ भादविक. ३०७,३०८,३४१,३३६,१४३,१४८, १४९, ४२७,५०४, ५०६, ३४ यागुन्हयात अटक करण्यात . तसेच त्यांचे इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

या व्दारे अशा प्रकारच्या कृत्य करणा-या इसमांना सुचना देण्यात येते की, कायदा

हातात घेवुन गुन्हेगारी कृत्य करु नये अन्यथा त्यांचेवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्प्यात येईल. सदरची कामगिरीही मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक साो., मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१,

किरणकुमार चव्हाण साो., मा. सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग श्री. सिध्देश्वर धुमाळ साो., यांचे मार्गदर्शना खाली गंगापुर पोलीस स्टेशनवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उप निरीक्षक श्री. मोतीलाल पाटील, पोहवा. गिरीष महाले, रविंद्र मोहिते, गणेश रहेरे, पोना. मच्छिंद्र वाकचौरे, पोअं/ सोनु खाडे, गोरख साळुंके, भागवत थविल सर्व नेमणुक गंगापुर पोलीस स्टेशन अशांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *