google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

उंटवाडी येथील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी निरोप देताना डॉक्टर सिताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी केले मार्गदर्शन

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक वृत्त:- नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित उंटवाडी माध्यमिक विद्यालय नाशिक येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती नासिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर सिताराम कोल्हे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ना ए सोसायटीचे उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष माननीय चंद्रशेखर मोंढे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. या आशीर्वाद समारंभ प्रसंगी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिताराम कोल्हे सर यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले त्यांच्या एक तासाच्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन त्यांचे विचार ऐकत होते. यावेळी त्यांनी यशाची विविध सूत्रे विद्यार्थ्यांना अवगत करून दिलीत. यशापर्यंत जाण्याचे अनेक मार्ग त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कष्ट जिद्द आणि मेहनतीशिवाय यशाला दुसरा पर्याय नाही हेही त्यांच्या विचारातून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर मोंढे यांनी विद्यार्थ्यांनी भरपूर सराव करून परीक्षेला सामोरे जावे. परीक्षेला जाताना कुठलेही धडपण घेऊ नये. आपल्या शंका, अडचणी शिक्षकांकडून अजूनही समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ आहे. आपले शिक्षक नक्कीच अजूनही तुम्हाला मार्गदर्शन करतील असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रमुख पाहुणे डॉक्टर सिताराम कोल्हे यांचा परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बापूसाहेब चव्हाण यांनी करून दिला. त्यांनी परिचय करून देताना एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देताना विशेष आनंद होत आहे. अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचेअध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांचा परिचय अंजली सुपे या शिक्षिकेने करून दिला. अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या मनोगतातून त्यांनी शाळा आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना अनेक विद्यार्थ्यांना गहिवरून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका पूनम कुमावत यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब आहेर यांनी केले. यावेळी मंचावर शाळेचे उपमुख्याध्यापक श्री शरद शेळके, शाळेचे पर्यवेक्षक साहेबराव राठोड, शाळेचे पर्यवेक्षक बी एन सूर्यवंशी. शिक्षक प्रतिनिधी तथा संस्था सहकार्यवाह विजय मापारी व पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी ही उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार ज्येष्ठ शिक्षिका मंगला मोरे यांनी केले. यावेळी अनेक शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरमने झाला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *