google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव 2024 मोठ्या उत्साहात साजरा…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक:- संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने गेली 12 वर्षांपासून जिजाऊ जन्मोत्सव नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिजाऊ जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 11 तारखेला साजरा करून संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सिंदखेड राजा येथील उत्सवात सहभागी होत असतात त्याच्याच पृष्ठभूमीवर वर्षानुवर्षाची परंपरा रक्षण करत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिजाऊ जन्मोत्सव नाशिक शहराच्या मध्य स्थानी असलेल्या मेन रोडवर मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला.

यावेळी शिवकालीन ठेवा असलेल्या युद्ध सामुग्री यांचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. आनंद ठाकूर यांनी हा वारसा आपले सर्वस्व पणाला लाऊन जपला आहे. त्यांच्या आखाढ्याचे मर्दानी खेळाचे प्रत्यक्षिके सादर करून त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आलाजिजाऊ रत्न पुरस्कार हा संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने कर्तृत्व्वान महिलांना दिला जातो या मध्ये महिला व बालकल्याण आरोग्य व सामाजिक बांधिलकी किंबहुना स्त्रियांना त्यांच्या हक्क अधिकाराची जाणीव करून दिलेल्या महिलांना या कार्यक्रमावेळी सन्मानित करण्यात आले त्याच बरोबर भारतातील पहिल्या महिला पत्रकार असलेल्या व सत्यशोधक चळवळीला केंद्रस्थानी ठेऊन दीनबंधू वृत्तपत्र ज्यांनी चालवले त्यांच्या नावाने असलेल्या मराठा सेवा संघ प्रणित ताणूबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या नाशिक प्रमुख पदी स्वप्निल गोवर्धने यांची नियुक्ती करण्यात आली पेढे वाटून व जिजाऊ रत्न पुरस्कारचे वितरण करून हा दिमाखदार सोहळा पार पडलायावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे हिरामण नाना वाघ,ऍड.एकता खैरे,बापू चव्हाण,राजेंद्र शेळके,विकी ढोले,दिनेश चव्हाण,संदेश फुले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख स्वप्निल इंगळे,महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ,जिल्हासचिव नितीन रोठे पाटील,सरचिटणीस विकी गायधणी,शरद लभडे,अक्षय आठवले, विशाल अहिरराव,मंदार धिवरे,सागर पाटील,हरीश पाटील,राकेश जगताप, राहुल तिडके चेतन गोवर्धने,राहुल गोवर्धने,नितीन काळे,गणेश पाटील,शँकर वाघमारे,सुरेश सूर्यवंशी,राकेश भागवत,प्रवीण राजपूत, किरण गवारे इ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *