google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

स्त्रियांच्या व जन जोगत्याच्या भावनांना रंगमंच देईल का साथ?

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- जोगत्याचा जीवनप्रवास कसा असतो तसेच अनिष्ट रुढी परंपरा भाष्य करणारे “संगीत अवघडीचे पाच दिवस” नाटकातून सादरीकरण करण्यात आले आहे…
समाजात असणाऱ्या अनिष्ट रुढी परंपरा व प्रथा त्यामुळे स्त्रियांना होणारा मानसिक ताण यातून दाखवण्यात आला आहे, आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे “अप्पा जोगतीण”
भारतातील आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तसेच काही प्रमाणात शहरी अशिक्षित आणि जुन्या रूढी परंपरा मध्ये अडकलेले परिवार यांना मासिक पाळी विषयी गैरसमज त्या विषय अंधश्रद्धा, ट्रान्सजेन्डर यांच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन तसेच देवाच्या नावाने जन्म देणार्या बाळाला (मुलगी) देवाच्या दारात सोडने अशा परंपरा अजुन ही भारतातील काही भागांमध्ये आढळुन येतात. जसे की स्त्री ला मासिक पाळी आली की विटाळ आला आहे म्हणून पाच दिवस आपल्याच परिवारापासुन दुर ठेवलं जातं घरातील कोणत्याही वस्तुला किंवा व्यक्तीला स्पर्श करायचा नाही असं सांगितलं जातं अशा चालेल्या परंपरा खुपच भयंकर आहेत.

तसेच या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक ओमकार टिळे यांनी केले आहे…

अशाच सद्य परिस्थितीवर आधारित “संगीत अवघडीचे पाच दिवस” असे हे नाट्य नाशिककरांच्या भेटीला घेऊन येत आहोत..
येत्या १९ डिसेंबर सायंकाळी ५:३० वाजता
कवी कालिदास नाट्यमंदिर शालिमार नाशिक…

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *