google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

डेंगूच्या महामारीत प्रशासनाचे दुर्लक्ष ; आयुक्तांनासमोर नागरिकांनी मांडली व्यथा

author
0 minutes, 0 seconds Read


नाशिक रोड विभागीय आयुक्तांनासमोर नागरिकांनी मांडली व्यथा डेंगू सारख्या महामारी मध्ये प्रशासनाने परिसरा मध्ये लक्ष द्यावी तसेच शौचालयाची दुरुस्ती, किटकनाशक फवारणी यांसारख्या मोहिम परिसरात राबवण्यात याव्यात यासाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील रहिवाशांनी नाशिक रोड विभागीय आयुक्त मा.तुषार आहेर यांना निवेदन दिले.
वाढत्या डेंगूचे रुग्ण आणि परिसरात होणारी शौचालयाचे दुरावस्था व दुर्गंधी यामुळे नागरिकांचा आरोग्याच्या प्रश्न चव्हाट्यावर येत असून परिसरातील अनेक लहान मुले ,नागरिक या समस्येला त्रस्त झाले असून प्रशासनाने लवकरात लवकर स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी असे निवेदन देण्यात म्हटले. याप्रसंगी मातोश्री रमाबाई आंबेकर मधील रहिवाशी सुरेश इंगळे, राकेश पवार किरण गायकवाड, सिद्धार्थ आढाव ,रोहित भडांगे ,गजानन वडघर ,विकास हिरे आदी नागरिक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *