google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नांदगावात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना

author
0 minutes, 0 seconds Read
सहा महिन्यात दुसरी घटना नांदगांवात रक्षक बनतोय भक्षक

जगातील सर्वात पवित्र नात म्हणून बहीण भावाचं नात आहे. परंतु अलीकडच्या काळात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहे. नांदगाव मधील चांदोरा गावातील ठाकर वस्तीवर राहत असलेल्या एका पिडीत गतीमंद बहिणीवर सख्या चूलत भावाने एकांत बघून वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. याबाबत पिडित मुलीच्या आईने नांदगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नांदगाव पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत संशयितास ताब्यात घेतलं. बाळू जाधव आस ताब्यात घातलेल्या संशयिताच नाव आहे. नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे हे करीत आहेत.मात्र, सर्व गुणसंपन्न असलेल्या नांदगाव तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. त्यामुळं नांदगाव मध्ये नेमक चाललंय तरी काय असा प्रश्न नंदगवकरांना पडला आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नांदगाव करांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *