google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिकमध्ये बस दरीत कोसळून 2 ठार! 

author
0 minutes, 1 second Read

नाशिकमधील सापुतारा घाटातील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटामध्ये रविवारी एक बस थेट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा हादरवून टाकणारा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे. खरं तर सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस अधिक खडतर होत असून पावसामुळे येथील निसरड्या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. असाच एक अपघात रविवारी (7 जुलै 2024 रोजी)  झाला. प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू झाला असून एकूण 58 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचा नेमका क्षण बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. 

नेमकं घडलं काय?

अपघातग्रस्त बस ही गुजरातमधील सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती समोर येत आहे. ही लक्झरी बस 60 प्रवाशांना घेऊन परत जात असताना हा अपघात झाला. या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याचं दिसून येत आहे. सुरतमधील चौक बाजार-उधना येथील प्रवाशांना घेऊन जाणारी बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक जीजे 05 बी. टी. 9393 ही बस रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवाशांना घेऊन सापुतारा-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती. सायंकाळी सहाच्या सुमारास घाटात एक अवघड वळण घेताना लक्झरी बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस संरक्षण भिंतीला धडकून दरीत कोसळली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *