google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिकमध्ये डेंग्युचा प्रादुर्भाव वाढला…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिकमध्ये डेंग्युचे 96 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 365 वर पोहोचला आहे. सिडको विभागात सर्वाधिक म्हणजेच 38 रुग्ण आढळले आहेत. तर नाशिकरोड भागात 21, नाशिक पूर्व भागात 15 नाशिक पश्चिम पंचवटी भागात 10 तर सातपूर भागात 2 रुग्ण आढळले आहेत. डेंग्युवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नागरिकांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा खासगी रुग्णालयात उपचार घेणं पसंत केले आहे. तर दुसरीकडे डेंग्युचे रुग्ण वाढल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. आता प्रशासनाने डेंग्यु निर्मुलनासाठी जनजागृती मोहीम राबवायला घेतली आहे. तसेच डेंग्युच्या डासांची उत्पत्ती कारणीभूत ठरलेल्या आस्थापना आणि व्यक्तींना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *